शिकंदर जमादार यांची पूरग्रस्तांना आर्थिक मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:26 AM2021-07-31T04:26:20+5:302021-07-31T04:26:20+5:30
कसबे डिग्रज : कृष्णा नदीच्या महापुराचा मोठा फटका सांगलीकरांना बसला आहे. निवारा केंद्रातील पूरग्रस्तांना जेवण, चहा, नाष्टा इतर सोयी ...
कसबे डिग्रज : कृष्णा नदीच्या महापुराचा मोठा फटका सांगलीकरांना बसला आहे. निवारा केंद्रातील पूरग्रस्तांना जेवण, चहा, नाष्टा इतर सोयी उपलब्ध करून देण्यासाठी सह्याद्री समूहाचे संस्थापक, जिल्हा बँकेचे संचालक डॉ. शिकंदर जमादार यांनी २५ हजार रुपयांची मदत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मदानभाऊ युवा मंचला दिली.
मदानभाऊ युवा मंचच्यावतीने पूरग्रस्तांसाठी निवारा केंद्रे उभारण्यात आली आहेत. त्यात २२० नागरिक होते. त्यांच्या जेवण, चहा, नाष्टा व इतर सुविधांसाठी जमादार यांनी मदत दिली आहे. यावेळी पालकमंत्री जयंत पाटील, काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील, आनंदा लेंगरे उपस्थित होते.
फोटो : सांगलीत डॉ. शिकंदर जमादार यांच्यातर्फे पूरग्रस्तांना दिलेली आर्थिक मदत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते देण्यात आली. यावेळी पालकमंत्री जयंत पाटील, जयश्रीताई पाटील आदी उपस्थित होते.
300721\img-20210728-wa0058.jpg
पूरग्रस्तांना डॉ जमादार यांची आर्थिक मदत