शिराळा नगरपंचायत कर्मचाऱ्यांचे ‘लेखणी बंद’ आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:26 AM2021-04-16T04:26:53+5:302021-04-16T04:26:53+5:30
शिराळा : शिराळा नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी गुरुवारी ‘लेखणी बंद’ आंदोलन केले. यामुळे नागरिकांची विविध कामे होऊ शकली नाहीत. ...
शिराळा : शिराळा नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी गुरुवारी ‘लेखणी बंद’ आंदोलन केले. यामुळे नागरिकांची विविध कामे होऊ शकली नाहीत.
नगरपरिषद, नगरपंचायत, संवर्ग कर्मचारी हे एक वर्षापासून कोरोना साथीचे प्रतिबंधात्मक उपाययोजनाचे अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी म्हणून काम करत आहेत. यापुढेही काम करणार आहेत. परंतु शासनस्तरावर नगरपरिषद कर्मचारी यांचे वेतनसुध्दा नियमितपणे वेळेवर मिळण्याची दखलही घेतली जात नाही. संघटनेने आपल्या विविध प्रकारच्या न्याय व इतर विभागांच्या तुलनेत समान असलेल्या मागण्यांसाठी कर्मचारी वर्गाच्या मागण्यांबाबत शासन स्तरावर सकारात्मक विचार केला जात नाही. १०० टक्के वेतन, वेतनश्रेणी समानता, राजपत्रित दर्जा, सेवाज्येष्ठता यादी, कालबद्ध पदोन्नती, पदोन्नती, निवृती वेतन अंशदान भरणा, रोजंदारी कामगार नियमित करणे, नगरपंचायत समावेशन कर्मचारीबाबत आदी मागण्या आहेत.
याअगोदर संघटनेने शासनास दिलेल्या आंदोलनाच्या नोटिसीप्रमाणे १ एप्रिलरोजी काळी फित लाऊन शासनाच्या निषेधाचा पहिला टप्पा यशस्वी केला. नंतरही मागण्यांबाबत शासन स्तरावर दखल घेतली नाही. त्यामुळे दुसरा टप्पा आज ‘लेखणी बंद’चे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनामध्ये सांगली जिल्हा संघटनेचे उपाध्यक्ष प्रकाश शिंदे, सचिव लक्ष्मण मलमे, शिराळा संघटनेचे सचिव आबाजी दिवाण, अधीक्षक सुविधा पाटील, अर्चना गायकवाड, काजल शिंदे, प्रीती पाटील, विजय शिंदे, रंजना कांबळे, तात्यासाहेब कांबळे, संजय इंगवले, लेखापाल नयना कुंभार, संतोष कांबळे, सागर दाभाडे, गणपती यादव, पाणी पुरवठा अभियंता शरद पाटील, रमेश जाधव आदी उपस्थित होते.