video-शिराळा नगरपंचायतीने साकारला नेत्रदीपक तिरंगा, सांगली जिल्ह्यातील पहिलाच उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2022 05:08 PM2022-08-06T17:08:31+5:302022-08-06T17:12:01+5:30

सुमारे तीन हजार विद्यार्थ्यांच्या घोषणांच्या गजरात जगजागृती रॅली

Shirala Nagar Panchayat implemented the spectacular tricolor, a first-of-its-kind initiative in Sangli district | video-शिराळा नगरपंचायतीने साकारला नेत्रदीपक तिरंगा, सांगली जिल्ह्यातील पहिलाच उपक्रम

video-शिराळा नगरपंचायतीने साकारला नेत्रदीपक तिरंगा, सांगली जिल्ह्यातील पहिलाच उपक्रम

googlenewsNext

श्रीनिवास नागे

शिराळा (सांगली) : शिराळा नगरपंचायतीने ‘घरोघरी तिरंगा’ उपक्रमांतर्गत आज, शनिवारी १०० फूट लांब व ६७ फूट रुंद राष्ट्रध्वज फडकवण्याचा सांगली जिल्ह्यातील पहिलाच उपक्रम राबविला. या उपक्रमामध्ये शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थी सहभागी झाले होते.

प्रारंभी न्यू इंग्लिश स्कुल, कन्या शाळा, श्री शिवछत्रपती विद्यालय, विश्वासराव नाईक व बाबा नाईक महाविद्यालय, भारतीय विद्यानिकेतन, यशवंत बालक मंदिर, सदगुरु प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा, उर्दू शाळा, जिल्हा परिषद शाळा, तसेच शहरातील सर्व शासकीय कार्यालयांच्या सहभागाने शहरातील प्रमुख मार्गावरुन ‘घरोघरी तिरंगा’ अभियानाबाबत जनजागृती करण्यात आली. सुमारे तीन हजार विद्यार्थ्यांच्या घोषणांच्या गजरात जगजागृती रॅलीची सुरुवात झाली. शहरातील प्रमुख मार्गावरुन रॅलीचा समारोप श्री शिवछत्रपती विद्यालय मैदानात करण्यात आला. यावेळी तहसीलदार गणेश शिंदे यांनी घरोघरी तिरंगा अभियानाबाबत माहिती दिली.

कार्यक्रमाचा प्रमुख भाग असलेला व प्रमुख आकर्षण ठरलेला १०० फूट लांब व ६७ फूट रुंद तिरंगा ध्वज विद्यार्थ्यांच्या शिरावरून रिमझिम पावसात डौलात फडकविण्यात आला. या फडकलेल्या राष्ट्रध्वजाला उपस्थित सर्वांनीच राष्ट्रगीत गावून मानवंदना दिली.

मुख्याधिकारी योगेश पाटील, गटविकास अधिकारी संतोष राऊत, पोलिस निरीक्षक सुरेश चिल्लावार, सहाय्यक निरीक्षक ज्ञानदेव वाघ, गटशिक्षण अधिकारी प्रदीप कुडाळकर, सुविधा पाटील, अर्चना गायकवाड, संजय इंगवले, लक्ष्मण मलमे, सुभाष इंगवले, सदानंद टिळे, विजय शिंदे, काजोल शिंदे, प्रीती पाटील उपस्थित होते.


Web Title: Shirala Nagar Panchayat implemented the spectacular tricolor, a first-of-its-kind initiative in Sangli district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.