‘शिराळा शहर हरित शहर’ अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:23 AM2021-01-02T04:23:07+5:302021-01-02T04:23:07+5:30

शिराळा : शिराळा नगरपंचायतीचा नववर्षाचा संकल्प ‘शिराळा शहर हरित शहर’ करण्याच्या दृष्टीने माझी वसुंधरा अभियान व स्वच्छ सर्वेक्षण ...

‘Shirala Shahar Harit Shahar’ campaign | ‘शिराळा शहर हरित शहर’ अभियान

‘शिराळा शहर हरित शहर’ अभियान

googlenewsNext

शिराळा : शिराळा नगरपंचायतीचा नववर्षाचा संकल्प ‘शिराळा शहर हरित शहर’ करण्याच्या दृष्टीने माझी वसुंधरा अभियान व स्वच्छ सर्वेक्षण २०२१ अंतर्गत शहरात विविध ठिकाणी वृक्ष लागवड करून संवर्धन करण्याचा संकल्प करण्यात आला. यावेळी नगराध्यक्षा सुनीता निकम, मुख्याधिकारी योगेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

निकम म्हणाल्या. संपूर्ण जग नव्या स्वप्न व संकल्पासह नवीन वर्षात पदार्पण करीत असतानाच शिराळा नगरपंचायतीने एक अभिनव संकल्प करून तो आचरणात आणण्याचा हरित मानस रचला आहे. माझी वसुंधरा अभियान व स्वच्छ सर्वेक्षण २०२१ अंतर्गत शिराळा शहर हरित शहर बनविण्याच्या उद्देशाने शहरात विविध ठिकाणी वृक्ष लागवड करून संवर्धन करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. आज नागकट्टा येथे वृक्ष लागवड करण्यात आलेल्या झाडांच्या मशागतीचे काम करण्यात आले. नगर पंचायतीमार्फत माझी वसुंधरा अभियान, तसेच स्वच्छ सर्वेक्षण २०२१ अंतर्गत आठवड्याच्या प्रत्येक शुक्रवारी श्रमदानाचे आयोजन करण्यात येणार आहे. शहरातील स्वच्छतेच्या अनुषंगाने विविध ठिकाणी श्रमदान, तसेच स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आली.

महाराष्ट्र राज्य शासनाच्या पर्यावरण व वातावरण बदल विकास मंत्रालयाच्या सूचनेनुसार पृथ्वी, जल वायू, अग्नी व आकाश या पंचतत्त्वांच्या जपणुकीसाठी राबविण्यात येत असलेल्या या अभियानाचा भाग म्हणून हरित शपथ घेऊन नव वर्षाच्या संकल्पाच्या अंमलबजावणीस सुरुवात करण्यात आली. श्रमादानांतर्गत लागवड करण्यात आलेल्या झाडांना नगरपंचायतीच्या सेंद्रिय खत निर्मिती प्रकल्पातून निर्मित खत घालणे, तण काढणे, पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी उपाययोजना, आदी कामे करण्यात आली.

यावेळी नगराध्यक्षा सुनीता निकम, मुख्याधिकारी योगेश पाटील, माजी उपनगराध्यक्ष किर्तीकुमार पाटील, नगरसेवक संजय हिरवडेकर, नगरसेविका अ‍ॅड. नेहा सूर्यवंशी, सीमा कदम, राजश्री यादव, चंद्रकांत निकम, नरेंद्र सूर्यवंशी, तसेच नगरपंचायतीचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: ‘Shirala Shahar Harit Shahar’ campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.