शिराळा मतदार संघाचा समतोल विकास करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:32 AM2021-09-10T04:32:07+5:302021-09-10T04:32:07+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : शिराळा मतदार संघाचा समतोल विकास साधण्याचे काम करणार आहे, असे प्रतिपाद आमदार मानसिंगराव नाईक ...

Shirala will develop the constituency in a balanced manner | शिराळा मतदार संघाचा समतोल विकास करणार

शिराळा मतदार संघाचा समतोल विकास करणार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

शिराळा : शिराळा मतदार संघाचा समतोल विकास साधण्याचे काम करणार आहे, असे प्रतिपाद आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले.

वाकुर्डे खुर्द व शिरशी (ता. शिराळा) येथे विविध विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी आ. नाईक बोलत होते. यावेळी सदस्य सम्राटसिंग नाईक, महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा साधना पाटील प्रमुख उपस्थित होत्या.

आ. नाईक म्हणाले, मतदारसंघातील प्रत्येक गाव विकासाच्या प्रवाहात असायला पाहिजे. गरजेच्या कामांना प्राधान्य देऊन ती पूर्ण केली जात आहेत. विकसकामांना निधी मिळवण्यात कोणतीही अडचण येत नाही. महाआघाडी सरकार शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेचा सरकारवर मोठा विश्वास आहे.

आमदार नाईक यांच्याहस्ते वाकुर्डे खुर्द येथील पाटील गल्ली काँक्रिटीकरण कामाचा, तर शिरसी येथील १५ व्या वित्त आयोगातून मंजूर झालेल्या माने गल्लीतील बंदिस्त गटर बांधकामाचा प्रारंभ झाला. वाकुर्डे खुर्द येथे उपसरपंच नंदाताई जाधव, सदस्य सुप्रिया पाटील, सोसायटी अध्यक्ष तानाजी पाटील, बबन परीट, माजी सरपंच नामदेव पाटील, कृषा पाटील, विजय जाधव, संजय पाटील, अशोक व शामराव पाटील, रामराव, शिवाजी, दीपक, वसंत व, प्रकाश जाधव आदी, तर, शिरसी येथे नाईक दूध संघाचे संचालक श्रीरंग भोसले, रघुनाथ भोसले, सुभाष भोसले, तानाजी माने, विलास पाटील, शंकर, शिवाजी, सचिन व शेखर भोसले, डॉ. सुभाष महिंद, लक्ष्मण दंडवते आदी उपस्थित होते.

Web Title: Shirala will develop the constituency in a balanced manner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.