शिवप्रताप मल्टीस्टेट मायक्रो फायनान्समध्ये उतरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:27 AM2021-04-20T04:27:18+5:302021-04-20T04:27:18+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क विटा : येथील शिवप्रताप मल्टीस्टेट पतसंस्थेने १५० कोटी रुपयांचा ठेवींचा टप्पा पूर्ण केल्यानंतर आता बचत गटांना ...

Shiv Pratap will venture into multistate microfinance | शिवप्रताप मल्टीस्टेट मायक्रो फायनान्समध्ये उतरणार

शिवप्रताप मल्टीस्टेट मायक्रो फायनान्समध्ये उतरणार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

विटा : येथील शिवप्रताप मल्टीस्टेट पतसंस्थेने १५० कोटी रुपयांचा ठेवींचा टप्पा पूर्ण केल्यानंतर आता बचत गटांना अर्थसहाय्य करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापार्श्वभूमीवर शिवप्रताप मल्टीस्टेट पतसंस्था मायक्रो फायनान्समध्ये उतरणार असून मायक्रो फायनान्समध्ये प्रभावी काम करणाऱ्या इरसेड या संस्थेशी १० कोटी रुपयांचा करार केला असल्याची माहिती शिवप्रतापचे कार्यकारी संचालक विठ्ठल साळुंखे यांनी दिली.

विठ्ठल साळुंखे म्हणाले, कोरोना महामारीमुळे अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडलेली आहे. ज्यांचे हातावर पोट आहे, असे हातगाडी चालक, शेत मजूर, भाजीपाला विक्रेते, बांधकाम मजुर या तळागाळातील घटकांवर त्याचा जादा परिणाम झाला आहे. त्यांना पुन्हा उभे करणे, आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हे खरे आव्हान आता पेलण्याचे काम शिवप्रताप संस्था करणार आहे. त्यापार्श्वभूमीवर वंचित घटकांना अर्थसहाय्य करून त्यांचे संसार पुन्हा उभा करण्याचे धोरण संस्थेने ठरविले आहे.

त्यामुळे शिवप्रताप मल्टीस्टेट मायक्रो फायनान्समध्ये उतरणार असल्याचे इरसेड संस्थेशी करार केला आहे.

इरसेडचे प्रथमेश कुलकणी, किरण कुलकर्णी यांंच्या उपस्थितीत हा करार झाला असून महिला बचत गटांना सक्षम करण्यासाठी त्यांना व्यवसाय, प्रशिक्षण तसेच त्यांच्या उत्पादित मालाला बाजारपेठ मिळवून देण्याचे काम केले जाणार आहे. यात शिवप्रताप मल्टीस्टेट प्रभावीपणे काम करेल, असेही कार्यकारी संचालक विठ्ठल साळुंखे म्हणाले.

यावेळी सरव्यवस्थापक धोंडीराम जाधव, सिकंदर शेख, माणिक जाधव, हणमंत माळी, सुजाता भिसे, हणमंतराव पाटील उपस्थित होते.

Web Title: Shiv Pratap will venture into multistate microfinance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.