‘शिवप्रताप’चा नाभिक समाजाला मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:21 AM2021-06-02T04:21:10+5:302021-06-02T04:21:10+5:30
फोटो लोकमत न्यूज नेटवर्क विटा : लॉकडाऊनमुळे नाभिक समाजाचे व्यवसाय बंद झाल्याने उपासमारीची वेळ आहे. मात्र, विटा येथील उद्योजक ...
फोटो
लोकमत न्यूज नेटवर्क
विटा : लॉकडाऊनमुळे नाभिक समाजाचे व्यवसाय बंद झाल्याने उपासमारीची वेळ आहे. मात्र, विटा येथील उद्योजक प्रतापराव साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या शिवप्रताप मानव कल्याण संस्थेने नाभिक समाजाला जीवनावश्यक वस्तूंचे किट देऊन मदतीचा हात दिल्याचे प्रतिपादन युवा नेते डॉ. जितेश कदम यांनी केले.
येथे ‘शिवप्रताप’च्या वतीने नाभिक समाजाला जीवनावश्यक २० वस्तूंचा समावेश असलेल्या किटचे वाटप डॉ. कदम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी संतोष भोर, अध्यक्ष विठ्ठलराव साळुंखे, जि. प. सदस्या सुलभा आदाटे, पंचायत समिती सदस्य संजय मोहिते, राज्य नाभिक समाजाचे उपाध्यक्ष प्रा. सोमनाथ साळुंखे उपस्थित होते.
प्रांताधिकारी भोर म्हणाले, उद्योजक साळुंखे यांनी सामाजिक बांधीलकी जोपासली आहे.
यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात किटचे वाटप करण्यात आले. उर्वरित नाभिक समाजाला घरपोहोच किटचे वाटप केले. राजू राजे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी अमोल माळी, सयाजीराव धनवडे, शशिकांत आदाटे, विश्वास सूर्यवंशी, नितीन खंडागळे, दत्ता गायकवाड, राजेंद्र निकम, राजू गायकवाड, सतीश सूर्यवंशी, विलास यादव, राजेंद्र शिंदे, विठ्ठल घोरपडे उपस्थित होते. रमेश शिरतोडे यांनी आभार मानले.