‘कसले पैसे मागतोस, तुला आलेले पैसे पक्षाचेच; जिवंत ठेवत नाही म्हणत शिवसेना प्रमुखांसह चौघांवर हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2022 02:14 PM2022-10-07T14:14:17+5:302022-10-07T14:14:47+5:30

याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल

Shiv Sena chief attacked on four people in Tasgaon Sangli district, case registered against six people | ‘कसले पैसे मागतोस, तुला आलेले पैसे पक्षाचेच; जिवंत ठेवत नाही म्हणत शिवसेना प्रमुखांसह चौघांवर हल्ला

‘कसले पैसे मागतोस, तुला आलेले पैसे पक्षाचेच; जिवंत ठेवत नाही म्हणत शिवसेना प्रमुखांसह चौघांवर हल्ला

googlenewsNext

तासगाव : तासगाव शहर शिवसेना प्रमुख संजय चव्हाण यांच्यासह चौघांवर खुनीहल्ला करण्यात आला. पैशाच्या देवाण-घेवाणीतून हा प्रकार घडला. हल्ल्यात चाकू, लोखंडी रॉडचा वापर करण्यात आला. याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल आहे. ही घटना मंगळवारी रात्री साडेआकरा वाजत घडली. प्रमोद सावंत, रोहित सावंत, प्रमोद दरेकर, प्रदीप दरेकर यांच्यासह दोन अनोळखी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

येथील घिसाडी पुलावर संजय चव्हाण यांनी प्रमोद सावंत याला हातउसने दिलेले पैसे मागितले. यावेळी सावंत याने चव्हाण यांना शिवीगाळ केली. त्यानंतर सावंत याला जाब विचारण्यासाठी चव्हाण यांची मुले अभिषेक व पवन हे त्याठिकाणी आले. त्यांच्यासोबत चव्हाण यांचे पाहुणे किरण साळुंखे हे देखील होते. यावेळी वादावादीस सुरुवात झाली. हा वाद मिटवण्यासाठी चव्हाण हे पुढे आले. यावेळी सावंत याने चव्हाण यांना उद्देशून ‘कसले पैसे मागतोस, तुला आलेले पैसे पक्षाचेच आहेत, तुला दाखवतोच, आज तुम्हाला जिवंत ठेवत नाही’, अशी धमकी दिली.

याचवेळी प्रमोद सावंत यांच्यासोबत आलेल्या रोहित सावंत याने संजय चव्हाण यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने चाकूने पोटावर वार केला. चव्हाण यांनी तो वार वाचवला. त्यानंतर रोहित याने केलेला वार चव्हाण यांच्या पोटाच्या डाव्या बाजूला लागला. याचवेळी प्रदीप दरेकर याने लोखंडी रॉडने चव्हाण यांच्या डोक्यात मारले. यावेळी चव्हाण यांची मुले अभिषेक, पवन व पाहुणे किरण साळुंखे यांनाही हल्लेखोरांनी मारहाण करुन जखमी केले. सर्व जखमींना खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, याप्रकरणी सहा जणांविरोधात येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: Shiv Sena chief attacked on four people in Tasgaon Sangli district, case registered against six people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.