शिवसेना राज्यात राष्ट्रवादीसोबत, इस्लामपुरात भाजपबरोबर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:32 AM2021-09-10T04:32:18+5:302021-09-10T04:32:18+5:30

अशोक पाटील लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका एकत्रित लढण्याच्या तयारीसाठी राष्ट्रवादी आणि शिवसेनेत चर्चा ...

Shiv Sena with NCP in the state, with BJP in Islampur | शिवसेना राज्यात राष्ट्रवादीसोबत, इस्लामपुरात भाजपबरोबर

शिवसेना राज्यात राष्ट्रवादीसोबत, इस्लामपुरात भाजपबरोबर

Next

अशोक पाटील

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका एकत्रित लढण्याच्या तयारीसाठी राष्ट्रवादी आणि शिवसेनेत चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र इस्लामपुरातील नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेने राष्ट्रवादी विरोधातील भाजपप्रणित सत्ताधारी विकास आघाडीबरोबर राहण्याची तयारी केली आहे.

इस्लामपूर नगरपालिकेत राष्ट्रवादीनंतर शिवसेना दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे. आगामी निवडणुकीत सर्व प्रभाग लढवण्याची तयारी केल्याचा दावा शिवसेनेने केला आहे. राष्ट्रवादीमध्ये इच्छुकांची संख्या पाहता ते इतर पक्षांशी तडजोड करणे अशक्यच आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेला स्वतःची ताकद दाखवावी लागेल. इस्लामपूर पालिकेतही तसेच असेल. राज्यात महाआघाडीची सत्ता आल्यापासून आगामी महापालिका, नगरपालिका निवडणुका एकत्रित लढवण्यासाठी वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू झाली आहे. परंतु काही नेते स्वबळाची भाषा करत आहेत. यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा स्वबळाच्या नाऱ्याची दखल शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांनी घेतली आहे. त्यामुळे इस्लामपूर पालिकेत विकास आघाडीबरोबर समझोता करण्याचा विचार पवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.

कोट

राज्यात महाआघाडीची सत्ता असली, तरी इस्लामपुरात मात्र नेहमीच राष्ट्रवादीविरोधात लढलो आहे. आगामी काळातही पालिका निवडणुकीतही स्वबळावर लढणार आहोत. आमच्या पक्षात उमेदवारांची कमतरता नाही. विकास आघाडीबरोबर समझोता करण्याचा प्रयत्न आहे.

- आनंदराव पवार, जिल्हाप्रमुख, शिवसेना.

Web Title: Shiv Sena with NCP in the state, with BJP in Islampur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.