खत, इंधन, डाळीच्या दरवाढीचा शिवसेनेतर्फे निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:28 AM2021-05-20T04:28:31+5:302021-05-20T04:28:31+5:30
इस्लामपूर : कोरोना महामारीच्या काळात जगणे मुश्कील झाले असताना शेतकऱ्याला उद्ध्वस्त करण्याचा डाव केंद्र शासन खेळत आहे, असा आरोप ...
इस्लामपूर : कोरोना महामारीच्या काळात जगणे मुश्कील झाले असताना शेतकऱ्याला उद्ध्वस्त करण्याचा डाव केंद्र शासन खेळत आहे, असा आरोप करून खते, खाद्यतेल, डिझेल, पेट्रोल, सर्व डाळी यांच्या दरवाढीबाबत केंद्र शासनाचा शिवसेनेच्या वतीने निषेध करण्यात आला.
दरवाढ मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख नंदकुमार नीळकंठ यांनी दिला आहे. आ. सदाभाऊ खोत यांचाही यावेळी निषेध करण्यात आला. खोत यांनी शेतकऱ्यांची बाजू घेऊन पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करून दाखवावे. त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी काही देणे-घेणे राहिलेले नाही. भाजप नेत्यांनी दिलेल्या स्क्रिप्टवर मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडीवर खोत तोंडसुख घेतात, असेही नीळकंठ म्हणाले.
खोत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर करत असलेले आरोप थांबविले नाही तर शिवसेना तुमचा हिशोब केल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही नीळकंठ यांनी दिला. यावेळी तालुकाप्रमुख युवराज निकम, सागर मलगुंडे, शहरप्रमुख सतीश पाटील, योगेश हुबाले, अनंत नाईक उपस्थित होते.