इस्लामपुरात बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर शिवसेनेचा ढोलनाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:27 AM2021-01-23T04:27:53+5:302021-01-23T04:27:53+5:30
इस्लामपूर : वाळवा तालुक्यातील निकृष्ट रस्ते कामांचा निषेध नोंदविण्यासाठी सात दिवसांपासून येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर शिवसेनेचे धरणे आंदोलन ...
इस्लामपूर : वाळवा तालुक्यातील निकृष्ट रस्ते कामांचा निषेध नोंदविण्यासाठी सात दिवसांपासून येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर शिवसेनेचे धरणे आंदोलन सुरू आहे. शुक्रवारी शिवसैनिकांनी ढोल बजाओ आंदोलन केले.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांच्या आदेशावरून गेल्या सात दिवसांपासून हे धरणे आंदोलन सुरू आहे. रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे करतानाच या कामामध्ये येणाऱ्या अनेक झाडांची बेकायदेशीरपणे कत्तल करण्यात आली आहे. शिगाव-आष्टा-वडगाव या मार्गावर रस्त्याचे काम सुरू आहे. तिथे कोणतीही सुरक्षा नसल्याने १८ वर्षीय एका दुचाकीस्वाराचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
त्यामुळे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसह या रस्त्यांचे काम करणाऱ्या ठेकेदाराविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी शिवसैनिकांनी केली आहे.
या आंदोलनात तालुकाप्रमुख युवराज निकम, सागर मलगुंडे, अंकुश माने, रामचंद्र घारे, घनश्याम जाधव, अनिल तेवरे, महादेव तिवले, लक्ष्मण निकम, राजू शेवाळे, आनंदराव सावंत, सुनील पवार, राजाराम यादव, श्रीकांत क्षीरसागर, रोहित नाझरे, अनंत नाईक, तुषार हवलदार सहभागी झाले आहेत.
फोटो - २२०१२०२१-आयएसएलएम-शिवसेना आंदोलन न्यूज
इस्लामपूर येथील बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर सुरू असलेल्या आंदोलनात शिवसैनिकांनी ढोलवादन करून निषेध व्यक्त केला.