सांगलीत पेट्रोल, डिझेलदरवाढीच्या निषेधार्थ शिवसेनेचा थाळीनाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2021 01:21 PM2021-02-03T13:21:30+5:302021-02-03T13:23:07+5:30

ShivSena Sangli- पेट्रोल, डिझेल, गॅसदरवाढीच्या निषेधार्थ बुधवारी शिवसेनेच्यावतीने येथील स्टेशन चौकात थाळीनाद करण्यात आला. यावेळी आंदोलकांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पेट्रोल, डिझेलची दरवाढ रद्द करून इंधनाचा जीएसटीत समावेश करण्याची मागणीही करण्यात आली.

Shiv Sena's thalinad to protest against petrol and diesel price hike in Sangli | सांगलीत पेट्रोल, डिझेलदरवाढीच्या निषेधार्थ शिवसेनेचा थाळीनाद

सांगलीत पेट्रोल, डिझेलदरवाढीच्या निषेधार्थ शिवसेनेचा थाळीनाद

googlenewsNext
ठळक मुद्देसांगलीत पेट्रोल, डिझेलदरवाढीच्या निषेधार्थ शिवसेनेचा थाळीनाददरवाढही तात्काळ मागे घ्यावी, अशी मागणी

सांगली : पेट्रोल, डिझेल, गॅसदरवाढीच्या निषेधार्थ बुधवारी शिवसेनेच्यावतीने येथील स्टेशन चौकात थाळीनाद करण्यात आला. यावेळी आंदोलकांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पेट्रोल, डिझेलची दरवाढ रद्द करून इंधनाचा जीएसटीत समावेश करण्याची मागणीही करण्यात आली.

केंद्र शासनाने अर्थसंकल्पात पेट्रोल, डिझेलवर अनुक्रमे २.५० रुपे व ४ रुपये कृषी उपकर लावण्याची घोषणा केली. त्यात पेट्रोल, डिझेलचे दरही भरमसाठ वाढले आहे. याच्या निषेधार्थ शिवसेनेच्यावतीने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शहर प्रमुख अनिल शेटे, रावसाहेब घेवारे, बजरंग पाटील, प्रभाकर कुरळपकर, बाळासाहेब मगदूम, जितेंद्र शहा यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

आंदोलकांनी केंद्रातील भाजप सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. महिलांनी थाळीनाद करीत दरवाढीचा विरोध केला. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे जनता महागाईच्या खाईत लोटली आहे. दररोज पेट्रोल, डिझेल व गॅसचे दर वाढत आहे. इंधनाचे दर कमी करण्याचे आश्वासन मोदी सरकारने दिले होते. पण सत्तेत आल्यानंतर ६० रुपयांचे पेट्रोल १०० रुपयापर्यंत पोहोचले आहे. त्यात आता कृषी उपकर लागू करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे महागाई आणखी वाढणार आहे.

प्रत्येक राज्यात इंधनाचे दर वेगवेगळे आहेत. त्याचा जीएसटीत समावेश केल्यास पेट्रोलचे दर कमी होतील, तसेच सर्वच राज्यात एकच दर राहील. घरगुती गॅसच्या दरातही दोन महिन्यात १०० रुपये दरवाढ झाली आहे. ही दरवाढही तात्काळ मागे घ्यावी, अशी मागणीही आंदोलकांनी केली.

Web Title: Shiv Sena's thalinad to protest against petrol and diesel price hike in Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.