शिवाजीअण्णांचे संघटनात्मक कार्य पुढे चालू ठेवणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:41 AM2020-12-16T04:41:34+5:302020-12-16T04:41:34+5:30
सांगली : शिक्षक नेते, माजी आ. शिवाजीराव पाटील-अण्णा यांचे शिक्षणाचे आदर्श कार्य यापुढेही चालूच ठेवण्यात येईल, असा विश्वास अखिल ...
सांगली : शिक्षक नेते, माजी आ. शिवाजीराव पाटील-अण्णा यांचे शिक्षणाचे आदर्श कार्य यापुढेही चालूच ठेवण्यात येईल, असा विश्वास अखिल भारतीय शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष राजाराम वरूटे यांनी व्यक्त केला.
येलूर येथे शिवाजीराव पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त मंगळवारी विविध कार्यक्रम झाले. यावेळी राजाराम वरुटे बोलत होते. अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक महासंघ अध्यक्ष माधवराव पाटील, राज्य सल्लागार बाळासाहेब काळे, सरचिटणीस केशवराव जाधव, कोषाध्यक्ष तुकाराम कदम, राज्य सल्लागार वसंतराव हारुगडे, कॅथरीना परेरा आदी उपस्थित होते. यावेळी माजी आमदार ‘शिवाजीराव पाटील शिक्षक रत्न’ पुरस्काराने रशीद राजेसाब टपाल, नरेश जयवंत सावंत, कॅथरीना परेरा, शिवचंद्र पांचाळ, रणजितसिंह डिसले यांचा गौरव करण्यात आला. कोरोना योध्द्यांचा सत्कारही करण्यात आला.
शि. द. आण्णांच्या बहुमोल कार्याचा आढावा घेणाऱ्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी भालचंद्र डोईल, मच्छिंद्र ढमाळ, संभाजी बापट, राजेंद्र म्हात्रे, विकास शिंदे, तरुण मंडळ अध्यक्ष वसंत सावंत, सरचिटणीस सुरेश पवार, कार्याध्यक्ष धनंजय पाटील, धनराज पाटील, दत्तात्रय चव्हाण आदी उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष मुकुंद सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले. सरचिटणीस सुनील गुरव यांनी प्रास्ताविक केले. कोषाध्यक्ष राजू राजे यांनी आभार मानले.
चौकट
बँकेपुरते संघटनेचा वापर करणाऱ्यांचा बंदोबस्त करणार : माधवराव पाटील
शिक्षक बँकेच्या निवडणुकीपुरता संघटनेचा वापर काही मंडळी करत आहेत. या शिक्षकांचा आम्ही लवकरच बंदोबस्त करणार आहे, अशी टीका शिक्षक महासंघाचे अध्यक्ष माधवराव पाटील यांनी पुतणे धैर्यशील पाटील यांचे नाव न घेता केली.