शिवाजीराव नाईक ‘स्वाभिमानी’चे उमेदवार
By admin | Published: July 16, 2014 01:10 AM2014-07-16T01:10:53+5:302014-07-16T01:25:01+5:30
राजू शेट्टी : कोकण वगळता प्रत्येक विभागात जागांची मागणी करू
सांगली : माजी आमदार शिवाजीराव नाईक स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फेच आगामी विधानसभा निवडणूक लढविणार आहेत. अद्याप जागावाटपाचा निर्णय झालेला नाही. तरीही कोकण वगळता सर्वच विभागात आमची लढण्याची ताकद आहे. येत्या आठवडाभरात याचा निर्णय होईल, अशी माहिती ‘स्वाभिमानी’चे नेते खासदार राजू शेट्टी यांनी आज, मंगळवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
ते म्हणाले की, महायुतीच्या केंद्रीय समन्वय समितीचा मी सदस्य आहे. जागावाटपाबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. गत विधानसभा निवडणुकीत भाजप व शिवसेनेत २८८ जागांचे वाटप झाले होते. आता महायुतीत असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष, आरपीआय आणि शिवसंग्राम पक्ष या घटकपक्षांनाही काही जागा द्याव्या लागतील. या दोन्ही पक्षांच्या कोट्यातूनच त्या मिळणार आहेत. सांगली व कोल्हापूर हा आमचा बालेकिल्ला आहे. येथे आम्ही जागांसाठी आग्रही आहोत. सांगली जिल्ह्यात सध्या वाळवा, शिराळा, पलूस, जत, मिरजमध्ये सक्षम उमेदवार आहेत. तरीही मागणी केलेल्या सर्वच जागा मिळतील असे नाही. कोल्हापूरमध्येही आम्ही काही जागांची मागणी करणार आहोत. कोकण वगळता राज्यातील सर्वच विभागात आमची ताकद आहे. लढण्याची तयारीसुद्धा आहे. जेथे संघटना मजबूत असूनही सक्षम उमेदवार नाहीत, तेथे पक्षात नव्याने आलेल्यांनाही संधी देण्याचा विचार होईल. शिराळ्यातील शिवाजीराव नाईक स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडूनच लढणार आहेत. त्यामुळे त्या जागेचीही मागणी आहे. हा मतदारसंघ माझ्या लोकसभा मतदारसंघातील असल्यामुळे / पान ९ वर