शिवाजीराव पाटील सार्वजनिक वाचनालयाचे उपक्रम आदर्शवत : कैलास चव्हाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:35 AM2020-12-30T04:35:55+5:302020-12-30T04:35:55+5:30
आष्टा : शिवाजीराव पाटील (आप्पा) सार्वजनिक वाचनालयाने शहरातील गोरगरीब विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची पुस्तके मोफत वाचण्यास देऊन सामाजिक बांधिलकी ...
आष्टा : शिवाजीराव पाटील (आप्पा) सार्वजनिक वाचनालयाने शहरातील गोरगरीब विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची पुस्तके मोफत वाचण्यास देऊन सामाजिक बांधिलकी जपली आहे. वाचन संस्कृती वाढविण्यासाठी वाचनालयाने सुरू केलेले उपक्रम आदर्शवत आहेत, असे प्रतिपादन मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांनी केले.
शिवाजीराव पाटील वाचनालयाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. कैलास चव्हाण, अण्णासाहेब डांगे पब्लिक स्कूलचे प्राचार्य सुभाषराव पाटील, सांगली जिल्हा नियोजन समिती सदस्य झुंझारराव पाटील यांच्याहस्ते झाले.
यावेळी अभियंता गिरीश शेंडगे, पतसंस्थेचे अध्यक्ष अण्णासाहेब हालुंडे, उपाध्यक्ष केशव माळी, राजू पाटील, प्रदीप ढोले, पोपट माळी, मिलिंद गोखले, वाचनालयाचे सचिव सुनील पाटील, राजू ढोले यांसह सर्व संस्थांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, सभासद उपस्थित होते. यावेळी प्राचार्य सुभाष यांनी वाचनालयास पुस्तके भेट दिली.
फोटो: २९१२२०२०-आष्टा न्यूज
शिवाजीराव पाटील आप्पा सार्वजनिक वाचनालयाच्या कार्यक्रमप्रसंगी मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांचा सत्कार करताना माजी नगराध्यक्ष झुंजारराव पाटील, प्रदीप ढोले, प्राचार्य सुभाष पाटील, पोपट माळी आदी उपस्थित होते.