शिवभाेजन थाळी ठरली सामान्यांसाठी आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:33 AM2021-06-09T04:33:24+5:302021-06-09T04:33:24+5:30
इस्लामपूर येथील पंगत डायनिंगमधील शिवभाेजन केंद्रास उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी भेट दिली. रणजित शिंदे यांनी त्यांचे ...
इस्लामपूर येथील पंगत डायनिंगमधील शिवभाेजन केंद्रास उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी भेट दिली. रणजित शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी नितीन बानुगडे-पाटील, आनंदराव पवार, शकील सय्यद उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूूर : राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून सामान्य जनतेला मिळत असणाऱ्या शिवभाेजन थाळीला मिळणारा प्रतिसाद हा सरकारसाठी दुुवा ठरेल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणारी ही योजना लॉकडाऊन काळात सामान्यांना आधार ठरली आहे, असा विश्वास उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला.
अन्नदिनाचे औचित्य साधत उदय सामंत यांनी येथील प्रशासकीय इमारतीशेजारी पंगत डायनिंगमधील शिवभाेजन केंद्राला भेट दिली. याठिकाणी उपस्थित असणाऱ्या नागरिकांचा शिवभाेजन थाळीविषयी प्रतिसाद जाणून घेतला. केंद्रचालक रणजित शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले.
शिंदे यांनी या केंद्रातून शिवभाेजन थाळीसह गरजूंना घरपोच जेवण व्यवस्था, बंदोबस्तावरील पोलीस, रुग्णालयातील रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक तसेच ऑक्सिजनची वाहतूक करणाऱ्या चालकांनासुद्धा जेवण उपलब्ध करून दिल्याचे सांगितले.
यावेळी शिवसेनेचे उपनेते नितीन बानुगडे-पाटील, जिल्हा प्रमुख आनंदराव पवार, संजय विभूते, नगरसेवक शकील सय्यद, प्रदीप लोहार, जिल्हा पुरवठा अधिकारी बारवे, तालुका पुरवठा निरीक्षक बबन करे, केंद्राच्या संचालिका अलका शिंदे, सागर मलगुंडे, सुलाबाई साळुंखे उपस्थित होत्या.