पंढरपुरातील सभेहून परतणाऱ्या बसला आग, 42 शिवसैनिक बचावले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2018 11:13 AM2018-12-25T11:13:28+5:302018-12-25T11:28:31+5:30

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पंढरपुरातील सभेहून परतत असताना शिवसैनिकांच्या बसला आग लागल्याची घटना समोर आली आहे. पंढरपूर-मिरज रोडवरील नागज फाट्यावर ही घटना घडली.

shivsainik bus fire at pandharpur miraj road | पंढरपुरातील सभेहून परतणाऱ्या बसला आग, 42 शिवसैनिक बचावले

पंढरपुरातील सभेहून परतणाऱ्या बसला आग, 42 शिवसैनिक बचावले

Next
ठळक मुद्देशिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पंढरपुरातील सभेहून परतत असताना शिवसैनिकांच्या बसला आग लागल्याची घटना समोर आली आहे. पंढरपूर-मिरज रोडवरील नागज फाट्यावर ही घटना घडली.घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून बसमधील चालकांसह सर्व शिवसैनिक सुरक्षित आहेत.

सांगलीशिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पंढरपुरातील सभेहून परतत असताना शिवसैनिकांच्या बसला आग लागल्याची घटना समोर आली आहे. पंढरपूर-मिरज रोडवरील नागज फाट्यावर ही घटना घडली. या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून बसमधील चालकांसह सर्व शिवसैनिक सुरक्षित आहेत.

उद्धव ठाकरे यांची सोमवारी (24 डिसेंबर) पंढरपूर येथे महासभा आयोजित करण्यात आली होती. ज्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून शिवसैनिक पंढरपुरात दाखल झाले होते. त्यासाठी शिवसैनिकांनी एसटी महामंडळाची एक बस भाड्याने घेतली होती. मात्र सभेहून परतत असताना पंढरपूर-मिरज रोडवरील नागज फाट्यावर बसने अचानक पेट घेतला. गारगोटी आगाराची बस क्रमांक MH14 BT - 0728 ही पंढरपूरहुन गारगोटीला जात होती. बसमध्ये 42 शिवसैनिक होते. मात्र कोणालाही इजा झाली नसल्याची माहिती मिळाली आहे.

Web Title: shivsainik bus fire at pandharpur miraj road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.