अनिल बाबर यांची नाराजी दूर करण्यासाठी सेनेच्या हालचाली
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2020 04:21 AM2020-01-05T04:21:23+5:302020-01-05T04:21:43+5:30
खानापूर-आटपाडीचे आमदार अनिल बाबर यांची नाराजी दूर करण्यासाठी आता शिवसेनेच्या वरिष्ठ पातळीवरून हालचाली सुरू झाल्या आहेत.
विटा (जि.सांगली) : महाविकास आघाडीत मंत्रीपद न मिळाल्याने नाराज झालेले खानापूर-आटपाडीचे आमदार अनिल बाबर यांची नाराजी दूर करण्यासाठी आता शिवसेनेच्या वरिष्ठ पातळीवरून हालचाली सुरू झाल्या आहेत. शनिवारी मेळाव्यापूर्वी आमदार बाबर यांना राज्यमंत्री शंभूराज देसाई, शिवसेना नेते अनिल देसाई व सचिव विनायक राऊत यांनी संपर्क साधून मनधरणी केल्याचे वृत्त आहे.
खानापूर मतदारसंघातील आ. अनिल बाबर यांचे नाव मंत्रिपदाच्या शर्यतीत होते. परंतु मंत्रिमंडळ विस्तारावेळी त्यांना मंत्रिपदापासून दूर ठेवण्यात आले. परिणामी, त्यांच्यासह कार्यकर्तेही नाराज झाले. त्यातून कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर नाराजीबाबतचे संदेश व्हायरल केले. त्यामुळे जिल्हाप्रमुख संजय विभुते यांनी संपर्कप्रमुख नितीन बानुगडे-पाटील, शिवसेना नेते अनिल देसाई, सचिव विनायक राऊत यांच्याशी संपर्क साधून आ. बाबर यांच्या नाराजीबाबत सांगितले.