शिवसेनेची आमच्या मांडीला मांडी कशासाठी?, संजय राऊत यांना कवडीचीही किंमत नाही : मधू चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 11:13 AM2017-11-06T11:13:11+5:302017-11-06T11:26:38+5:30

भाजपवर टीका करणाऱ्यां शिवसेनेने सत्तेत आमच्या मांडीला मांडी लावण्याची भूमिका का स्वीकारली आहे, असा सवाल भाजपचे प्रवक्ते मधू चव्हाण यांनी सांगलीत पत्रकार परिषदेत केला. संजय राऊत यांना आम्ही कवडीचीही किंमत देत नाही. पूर्वीपासूनची युती टिकावी, असा आमचा प्रामाणिक हेतू आहे, मात्र शिवसेनेलाच विरोधी भाषा बोलायची आहे. गौरी लंकेश यांच्या हत्येचा मीसुद्धा निषेध करतो, मात्र त्या अत्यंत घाणेरड्या लेखिका व पत्रकार होत्या. हिंदू देव-देवतांची त्यांनी टिंगल टवाळी केली, असे चव्हाण म्हणाले.

Shivsena's lace for our thigh? : Madhu Chavan | शिवसेनेची आमच्या मांडीला मांडी कशासाठी?, संजय राऊत यांना कवडीचीही किंमत नाही : मधू चव्हाण

शिवसेनेची आमच्या मांडीला मांडी कशासाठी?, संजय राऊत यांना कवडीचीही किंमत नाही : मधू चव्हाण

Next
ठळक मुद्देसंजय राऊत यांना कवडीचीही किंमत नाहीगौरी लंकेश यांच्या हत्येचा निषेध, मात्र त्या अत्यंत घाणेरड्या पत्रकारधोरणे चांगली, अंमलबजावणीत अडथळेशासनाने राबविलेली धोरणे चांगली, अंमलबजावणीत अडथळे

सांगली ,दि.  ०६ : भाजपवर टीका करणाऱ्यां शिवसेनेने सत्तेत आमच्या मांडीला मांडी लावण्याची भूमिका का स्वीकारली आहे, असा सवाल भाजपचे प्रवक्ते मधू चव्हाण यांनी सांगलीत पत्रकार परिषदेत केला.


ते म्हणाले की, राज्य सरकाने अत्यंत चांगले काम गेल्या तीन वर्षात केले आहे. आकडेवारीनिशी आम्ही या बाबी स्पष्ट करू शकतो. विरोधक केवळ ढोंगीपणाचे दर्शन घडवित आहेत. आकडेवारीच्या पातळीवर त्यांनी आमच्याशी समोरासमोर युक्तिवाद करावा. आम्ही त्यासाठी तयार आहोत. शिवसेनाही विरोधकाची भाषा बोलत असेल तर ते जनतेला पटणार नाही.

सरकारविरोधातच बोलायचे असेल तर सत्तेत शिवसेना आमच्या मांडीला मांडी लावून का बसत आहे. आम्ही शिवसेनेची भूमिका म्हणून केवळ उद्धव ठाकरे आणि बाळासाहेबांशी प्रामाणिक असलेल्या सच्च शिवसैनिकांनाच मानतो. संजय राऊत यांना आम्ही कवडीचीही किंमत देत नाही. पूर्वीपासूनची युती टिकावी, असा आमचा प्रामाणिक हेतू आहे, मात्र शिवसेनेलाच विरोधी भाषा बोलायची आहे.


कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने जो काही आक्रोश सध्या सुरू केला आहे, तो त्यांचा व्यक्तिगत आक्रोश आहे. नोटाबंदीच्या काळात दोनशे व्यक्ति मृत झाल्या त्याचे आम्हालाही वाईट वाटते आता त्यांचे सुतकही संपल्यानंतर वर्षभर श्राद्ध घालण्याचे काम हीच मंडळी करीत आहेत.

आक्रोश त्याचवेळी करायला हवा होता, मात्र त्यांनी राजकीय सोयीचा कालावधि शोधला. वास्तविक या लोकांचा काळा पैसा नष्ट झाल्याने त्यांचा संताप व्यक्त होत आहे. सामान्य लोकांशी त्यांना काहीही देणे-घेणे नाही. सामान्य जनतेला सरकारचे चांगले हेतू समजल्यामुळेच निवडणुकांमध्ये लोक आमच्या बाजुने कौल देताना दिसत आहेत.


सिंचन, शिक्षण, बांधकाम, रस्ते अन्य पायाभूत सुविधा, योजना, वैद्यकीय सुविधा, खात्यावरील थेट अनुदान अशा अनेक स्तरावर सरकारने केलेल्या कामांचे परिणाम आकडेवारीतून दिसत आहेत. माझ्याकडे या सर्व गोष्टींचे आकडे आहेत. त्यामुळे वास्तवदर्शी आकडेवारीवर कोणाशीही सामना करायची माझी तयारी आहे, असे आव्हान त्यांनी दिले.


गौरी लंकेश घाणेरडी पत्रकार

गौरी लंकेश यांच्या हत्येचा मीसुद्धा निषेध करतो, मात्र त्या अत्यंत घाणेरड्या लेखिका व पत्रकार होत्या. हिंदू देव-देवतांची त्यांनी टिंगल टवाळी केली. सरकारवर अत्यंत घाणेरडे लेखन केले. त्यामुळे त्याबाबतीत आम्ही त्यांचे समर्थन कधीच करणार नाही. ज्यांनी हत्या केली त्यांना जरून पकडण्यात यावे, अशी आमची मागणी असेल, असे चव्हाण म्हणाले.

धोरणे चांगली, अंमलबजावणीत अडथळे

शासनाने राबविलेली सर्व धोरणे चांगली आहेत, मात्र त्याच्या अंमलबजावणीत अडथळे येत आहेत. प्रशासकीय स्तरावर अधिकारी आणि अन्य निमशासकीय संस्थांकडून गाफिलपणा झालेला आहे. या तांत्रिक चूका आहेत, असे चव्हाण म्हणाले.

बहु झाले बुद्धिमान, म्हणून घोळ

राज्यात निर्माण होत असलेल्या अडचणींना बहु झाले बुद्धिमान हेच मुख्य कारण आहे. समजुतदार लोकांची संख्या कमी झाल्यामुळे हे घडत असल्याचे चव्हाण म्हणाले.

चव्हाणांनी दिलेली आकडेवारी

  1. महाराष्ट्रात यावर्षी १ लाख २९ हाजारल ३४0 कोटींची गुंतवणूक झाली
  2. शिक्षेचा दर आघाडी सरकारच्या काळात ८ टक्के होता, तो भाजप काळात ४७ टक्के झाला
  3. देशाचा विकास दर अमेरिका, जपान, इंग्लंड, चीन यांच्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक.
  4. नोटाबंदीनंतर १६ हजार कोटींचा काळा पैसा नष्ट
  5. ८0 कोटींच्या बेनामी मालमत्ता सापडल्या.
  6. आघाडी सरकारच्या काळात उणे असलेला कृषी विकास दर भाजपच्या काळात १२.५ टक्के झाला.
  7. राज्यातील ११ हजार ४९४ गावे दुष्काळमुक्त झाली.

 

 

प्रवेश घटल्याने पतंगरावांचा संताप

पतंगराव कदम सध्या भारती विद्यापीठामुळे अडचणीत आले आहेत. शंभर टक्क्यांवरून त्यांचे प्रवेश आता १५ टक्क्यांपर्यंत घटल्याने ते या गोष्टीचा संताप सरकारवर व्यक्त करीत आहेत, अशी टीका मधू चव्हाण यांनी केली.

अभिव्यक्ति स्वातंत्र्य म्हणजे बेछुटपणा नव्हे

लोक अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावावर काहीही व्यक्त करीत आहेत. अभिव्यक्तीच्या नावावर बेछुटपणा खपवून घेतला जाणार नाही. आम्ही विरोधी नेत्यांवर टीका करताना भान ठेवतो, तसा ते ठेवत नाहीत, असे चव्हाण म्हणाले.

Web Title: Shivsena's lace for our thigh? : Madhu Chavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.