मिरजेत भाडेकरू काढण्यासाठी दुकान जमीनदोस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:19 AM2021-07-18T04:19:31+5:302021-07-18T04:19:31+5:30
मिरजेतील हॉटेल राजधानीच्या आवारात बावीस वर्षांपूर्वी थॉमस जेकब (रा. वसंत कॉलनी, मिरज) यांनी पंक्चर दुकानासाठी जागा भाड्याने घेतली होती. ...
मिरजेतील हॉटेल राजधानीच्या आवारात बावीस वर्षांपूर्वी थॉमस जेकब (रा. वसंत कॉलनी, मिरज) यांनी पंक्चर दुकानासाठी जागा भाड्याने घेतली होती. दोन वर्षांपूर्वी मालक इंद्रजीत पवार यांनी जेकब यांना दुकान मोकळे करण्यास सांगितले. जेकब थॉमस यांनी दुकान सोडण्यास असमर्थता दर्शविल्याने हा वाद न्यायालयात पोहोचला. जागेचा वाद न्यायप्रविष्ट असताना इंद्रजीत पवार व त्यांचा भाऊ राजू पवार यांनी रात्रीच्या वेळी जमाव जमवून पंक्चरचे दुकान जमीनदोस्त केले. दुकानातील पंक्चर मशीन, नवीन टायर्स, मोबाइल, रोख रक्कम चोरून नेऊन काही मशीनची मोडतोड केली. यामध्ये सात लाखांचे नुकसान झाल्याची तक्रार जेकब थॉमस यांनी पोलिसांत दिली आहे. याप्रकरणी जागामालक इंद्रजीत पवार व राजू पवार (रा. किल्ला भाग, मिरज) यांच्यासह अज्ञात दहा ते पंधरा जणांविरुद्ध गांधी चाैक पोलिसां गुन्हा दाखल करण्यात आला आहे.