दिवाळीसाठी बाजारपेठांत खरेदीच्या उत्साहाचे वारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2017 12:21 AM2017-10-06T00:21:23+5:302017-10-06T00:21:23+5:30

Shopping for the Diwali market | दिवाळीसाठी बाजारपेठांत खरेदीच्या उत्साहाचे वारे

दिवाळीसाठी बाजारपेठांत खरेदीच्या उत्साहाचे वारे

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : दसºयाच्या निमित्ताने वाहू लागलेले उत्साही वारे आता दिवाळीच्या सणातही आल्हाददायी चित्र निर्माण करू पाहत आहे. गेल्या काही महिन्यांपासून दाटलेले संक्रमणाचे ढग हटत असल्याने, यंदा दिवाळीत मोठ्या उलाढालीची अपेक्षा व्यापारी वर्गातून व्यक्त होत आहे. दसºयाला यंदा सांगलीसह जिल्ह्याच्या प्रमुख बाजारपेठांमध्ये समाधानकारक उलाढाल झाली. त्यामुळे व्यापारी वर्गाचे लक्ष आता दिवाळीकडे लागले आहे. महिनाअखेरीस आलेल्या दसºयामुळे बाजारपेठेला थोडा फटका बसल्याचे काहींचे मत आहे. तरीही दसºयाच्या तुलनेत दिवाळीकडून मोठी अपेक्षा व्यक्त होत आहे. ग्राहकांकडून आतापासूनच खरेदीची तयारी सुरू झाल्याचे बाजारपेठेतील चित्र आहे.
दुकानांमध्ये ग्राहकांसाठी अनेक आॅफर्स
- प्रवीण फल्ले, संचालक, सिद्धनाथ मोबाईल शॉपी, इस्लामपूर
गेल्या काही महिन्यांमधील परिस्थितीचा विचार करता, बाजारपेठेत खरेदीचा उत्साह जाणवत आहे. आतापासूनच ग्राहकांकडून चौकशी सुरू झाली आहे. मोबाईलच्या दुनियेत अनेक कंपन्यांनी अनेक प्रकारच्या व्हरायटी उपलब्ध केल्यामुळे ग्राहकांसमोर चांगले पर्याय उपलब्ध आहेत. नव्या तंत्रज्ञानाने सजलेले मोबाईल अधिक पसंतीस उतरत आहेत. किमतीच्या बाबतीतही प्रत्येक ग्राहकाचा विचार कंपन्या करू लागल्या आहेत. महागडा मोबाईलसुद्धा प्रत्येकाला खरेदी करता यावा, यासाठी फायनान्स कंपन्याही उपलब्ध आहेत. जास्त रोकड नसली तरी, महिन्याच्या हप्त्यांमध्ये आर्थिक नियोजन करून ग्राहकांना त्यांच्या पसंतीचा मोबाईल मिळू शकतो. शून्य टक्के दराने अर्थपुरवठा करणाºया अनेक कंपन्या आता बाजारात आल्या आहेत. त्याचा ग्राहकांना फायदा मिळत आहे. याशिवाय मोबाईल कंपन्यांनीही वेगवेगळ्या आॅफर्स दिवाळीच्या निमित्ताने ग्राहकांना उपलब्ध करून दिल्या आहेत. मोबाईलमध्ये कॅमेरा, व्हिडिओ, अ‍ॅडव्हान्स फिचर्स यांची चौकशी अधिक होते. आॅनलाईन बाजाराचा आमच्या व्यवसायावर फारसा परिणाम झालेला नाही. आजही बहुतांश ग्राहकांचा कल वस्तू हाताळून ती खरेदी करण्याकडे आणि आवश्यक सेवा मिळविण्याकडे दिसून येतो.
पुढील आठवड्यात उलाढाल अपेक्षित
- रमेश शहा, अध्यक्ष, गणपती पेठ मर्चंटस् असोसिएशन, सांगली
गतवर्षाच्या तुलनेत यंदा गणपती पेठेतील वातावरण थंड आहे. दिवाळीच्यादृष्टीने अद्याप बाजारात उत्साह दिसत नसला तरी, दिवाळीपूर्वीच्या पाच दिवसात उलाढाल अपेक्षित आहे. महिनाअखेरीस हा सण न आल्याने कदाचित नोकरदारांचे पगार झाल्यानंतर आॅक्टोबरच्या दुसºया आठवड्यात थोडा बदल जाणवण्याची चिन्हे आहेत. आॅनलाईनच्या बाजारापेक्षाही सध्या मोठमोठे मॉल सांगलीत आल्याने, त्यांचा परिणाम गणपती पेठेतील उलाढालीवर दिसून येतो. पूर्वी सांगलीच्या गणपती पेठेतून संपूर्ण जिल्हाभर माल जात होता. आता अनेक तालुक्यांमध्ये होलसेल बाजारपेठा तयार झाल्याने, गेल्या काही वर्षात याठिकाणच्या उलाढालीवर परिणाम झालेला आहे. पूर्वी कोणत्याही सणाच्या निमित्ताने पेठेतील व्यापारी मालाचा साठा करीत होते. आता जेवढा माल लागेल तेवढाच आणून त्याची विक्री केली जाते. मालाच्या दर्जाबाबत गणपती पेठेतील व्यापारी अत्यंत सतर्क आहेत. या पेठेची ती परंपराच आहे. याशिवाय आता ग्राहकच प्रचंड चोखंदळ झाला आहे. त्यामुळे त्याच्याकडूनच दर्जेदार मालाला अधिक पसंती मिळताना दिसून येते. त्यामुळे व्यापारीही ग्राहकांच्या मागणीप्रमाणे मालाची आवश्यक तेवढी उपलब्धता करताना दिसत आहेत.

Web Title: Shopping for the Diwali market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.