सांगलीतील दुकाने आजपासून उघडण्याचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:18 AM2021-07-08T04:18:33+5:302021-07-08T04:18:33+5:30
सांगली : जिल्हा प्रशासनाने १२ जुलैपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवहार बंद ठेवले आहेत. वास्तविक केवळ २० टक्केच व्यवसाय ...
सांगली : जिल्हा प्रशासनाने १२ जुलैपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवहार बंद ठेवले आहेत. वास्तविक केवळ २० टक्केच व्यवसाय बंद आहेत. त्यामुळे उद्या ८ जुलैपासून सर्वच दुकाने उघडणार असल्याचे सांगली, मिरज आणि कुपवाड व्यापारी महासंघाचे अध्यक्ष अतुल शहा यांनी सांगितले.
याबाबत जिल्हाधिकारी डाॅ. अभिजित चौधरी व आयुक्त नितीन कापडणीस यांना निवेदनही देण्यात आले. शहा म्हणाले की, सध्या निर्बंधांत जवळपास ८0 टक्के व्यवहार सुरू आहेत. त्यामध्ये दवाखाने, विमा कार्यालये, बँका, औषध दुकाने, इतर वैद्यकीय सेवा, किराणा, बेकरी, फळ व भाजीपाल्यासह अनेक व्यवहार सुरू आहेत. त्यामुळे रस्त्यावर गर्दी होत आहे. हे सर्व व्यवसाय सुरू ठेवण्यास आमचा आक्षेप नाही. अत्यावश्यक वगळता केवळ २० टक्के व्यवसाय बंद आहेत. या घटकांना कोणत्याही प्रकारची मदत दिलेली नाही. दुकानदारांवर स्वत:च्या कुटुंबासह कामगारांचे पगार, बँकांचे हप्ते, व्याज भरण्याचे संकट आहे.
त्यासाठी आम्ही ८ जुलैपासून सर्वच दुकाने सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी महेंद्र तेजवानी, राजेश दरगड, सुभाष सारडा, अश्विन दावडा, राजेश चावला, मिरज व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष विराज कोकणे, अभय गोगटे, ओंकार शिखरे, अमर दिडवळ, राजेंद्र पवार, अनिल कवठेकर, बिरू आस्की उपस्थित होते.