बिऊरमध्ये शॉर्टसर्किटने आग; दीड एकरातील गवत जळाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 04:21 AM2020-12-07T04:21:22+5:302020-12-07T04:21:22+5:30
शिराळा : बिऊर (ता. शिराळा) येथील शांतिनगर येथे शॉर्टसर्किटमुळे आग लागून दीड एकरामधील गवत जळून खाक झाले. रविवारी दुपारी ...
शिराळा : बिऊर (ता. शिराळा) येथील शांतिनगर येथे शॉर्टसर्किटमुळे आग लागून दीड एकरामधील गवत जळून खाक झाले. रविवारी दुपारी दोन वाजता ही घटना घडली.
शांतिनगर येथे असलेल्या वीज खांबावरून शॉर्टसर्किट होऊन गवत जळून खाक झाले. याठिकाणी जवळपास असणारे ५० एकरच्या आसपास संपूर्ण गवत जळून खाक झाले असते. दुपारच्या वेळेत लागलेली आग विझविणे फारच कसरतीचे होते. त्यातच वाऱ्यामुळे आग विझविणे फार धोक्याचे होते. परंतु गावातील काही तरुणांनी आग आटाेक्यात आणली. त्यामुळे दीड-दोन एकरामधील गवत जळाले. आग विझल्यामुळे पुढील जवळपास पन्नास एकराच्या आसपास असणारे गवताचे रान वाचले.
काेट
गेली चार वर्षे वरचे वर या भागात शॉर्टसर्किटमुळे आगीच्या घटना घडतात. वीज वितरण कंपनी याकडे दुर्लक्ष करत आहे. आज जर शेतकरी येथे आले नसते, तर जवळपास ५२ एकर क्षेत्र जळीत झाले असते. या झालेल्या नुकसानीची भरपाई कोण देणार? काय करायचे गरीब शेतकऱ्यांनी? यात आमची काय चूक होती?
- मधू पाटील, रान मालक
काेट
आम्ही जनावरे घेऊन पावलेवाडीच्या खंडित होतो. तेथून आग दिसल्यानंतर विझविण्यासाठी आम्ही पळत आलो. जवळपास दीड एकराच्या आसपास रान जळाले आहे.
आम्ही दहा हजार रुपये एक ट्रॉली, असे गवत विकत घेतोय. त्यात असे शॉर्टसर्किटने नुकसान होणार असेल, तर आम्हाला काय परवडणार आहे.
- शेतकरी