आरोग्य सभापती दाखवा, हजार रुपये मिळवा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:26 AM2020-12-31T04:26:36+5:302020-12-31T04:26:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : गेल्या चार वर्षांतील एक वर्ष कोरोनात गेले, मात्र तीन वर्षांत भुयारी गटारांचे काम सोडले;,तर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : गेल्या चार वर्षांतील एक वर्ष कोरोनात गेले, मात्र तीन वर्षांत भुयारी गटारांचे काम सोडले;,तर इस्लामपूर शहरात ठळकपणे काहीही विकास झालेला नाही. स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. डेंग्यू, चिकुनगुन्या साथीने थैमान घातले आहे. राष्ट्रवादीकडे चार सभापतीपदे आहेत, परंतु लोकांना सभापतींची ओळखही नाही. आरोग्य सभापती दाखवा आणि हजार रुपये मिळवा, असे लोक बोलत आहेत.
शहरातील स्वच्छतेवर वर्षाकाठी तीन कोटी रुपये खर्च केले जातात, तरीही स्वच्छतेचा अभाव आहे. विविध प्रभागांसह मुख्य रस्त्यांच्या गटारीही तुंबलेल्या दिसतात. औषध फवारणी वेळेत होत नसल्याने डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात झाली आहे. यावर आरोग्य विभागाचे नियंत्रण राहिले नाही. कचरा वेळेवर उचलला जात नाही. काही ठराविक भागातच स्वच्छता केली जाते. राष्ट्रवादीकडे आरोग्य सभापतीपद आहे. परंतु त्यांना निर्णय घेता येत नाहीत. त्यामुळे ते फक्त पदापुरतेच आहेत. त्यांचा आरोग्य विभागावर वचक नाही. याचाच फायदा नगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. स्वच्छता ठेकेदाराकडे रस्ते साफ करणे, गटारी उपसणे, औषध फवारणी करणे, सार्वजिनक स्वच्छतागृहे स्वच्छ करणे आदी कामे देण्यात आली आहेत. परंतु ती वेळेवर होत नसल्याने विविध आजारांचा फैलाव झाल्याचे दिसते.
कोट
आरोग्य अधिकारी या पदावर रूजू झाल्यापासून आरोग्य सभापतींनी एकही नियोजनाची बैठक घेतलेली नाही. शहरातील स्वच्छतेबाबत दक्षता घेत आहोत. अस्वच्छतेबाबत येणाऱ्या तक्रारींचे निवारण तातडीने करीत आहोत. त्यामुळे अस्वच्छतेचा प्रश्नच उद्भ वत नाही.
- जमीर मुश्रीफ, आरोग्य अधिकारी, इस्लामपूर नगरपरिषद
फोटो - ३०१२२०२०-आयएसएलएम-इस्लामपूर न्यूज
इस्लामपूूर बसस्थानक परिसरात नेहमीच प्रवाशांची वर्दळ असणाऱ्या ठिकाणी अशी नेहमी दुर्गंधी असते.