बेडगेत कोरोनावर मात केलेल्यांवर फुलांचा वर्षाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:27 AM2021-05-21T04:27:48+5:302021-05-21T04:27:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क टाकळी : बेडग ( ता . मिरज) येथील ग्रामपंचायतीच्या विलगीकरण कक्षातील सहा कोरोना बाधित रुग्ण ...
लोकमत न्यूज नेटवर्क
टाकळी : बेडग ( ता . मिरज) येथील ग्रामपंचायतीच्या विलगीकरण कक्षातील सहा कोरोना बाधित रुग्ण बरे झाले. त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करीत त्यांना घरी सोडण्यात आले. याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन चिकुर्डेकर व सीएचओ डॉ. चंद्रलेखा विभुते उपस्थित होते.
बेडग हायस्कूलमध्ये विलगीकरण कक्षाची सुरुवात करण्यात आली आहे. सौम्य लक्षणे असणारे कोरोना बाधित रुग्ण येथे उपचार घेत होते. मागील १४ दिवसापासून डॉ. चिकुर्डेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील खासगी डॉक्टर हे सर्व रुग्णांची वैद्यकीय तपासणी करीत होते. सुजित लकडे रुग्णांना दोनवेळचे जेवण व संभाजीराजे पाटील हे रुग्णांना नाश्ता मोफत देत होते. गावातील पत्रकारांनी चहाची सोय मोफत केली होती. १४ दिवसानंतर विलगीकरण कक्षातील रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. यावेळी फुलांचा वर्षाव करण्यात आला.
यावेळी डॉ. नितीन चिकुर्डेकर, डॉ. चंद्रलेखा विभुते, सरपंच रूपाली शिंदे, उपसरपंच शरद ओमासे, उमेश पाटील, सुजित लकडे, संभाजीराजे पाटील, डॉ. प्रवीण पाटील, डॉ. शेंडगे. डॉ. सुधांशू शेंडगे, डॉ. संतोष पाटील, ग्रामसेवक मधुकर कांबळे, अमर भय्या पाटील, दिगंबर कोकाटे, महेश सानप, आशा वर्कर उपस्थित होते.