श्रावण सुरू झाला, भाज्या स्थिरावल्या, मेथी २०, तर कोथिंबीर १५ रुपये पेंढी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:30 AM2021-08-12T04:30:06+5:302021-08-12T04:30:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : श्रावण महिना सुरू झाल्याने पालेभाज्यांचा बाजार स्थिरावला आहे. बाजारात आवकदेखील मुबलक नाही. किरकोळ बाजारात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : श्रावण महिना सुरू झाल्याने पालेभाज्यांचा बाजार स्थिरावला आहे. बाजारात आवकदेखील मुबलक नाही. किरकोळ बाजारात मेथीची पेंडी २० रुपयांना, तर कोथिंबिरीची पेंढी १० ते १५ रुपयांना विकली जात आहे.
श्रावण महिना सुरू होताच मांसाहार कमी होऊन भाजीपाल्याला पसंती मिळते असा अनुभव आहे, त्यामुळे दरही चढे राहतात. प्रत्यक्षात सध्याची स्थिती मात्र शेतकऱ्यांसाठी फारशी समाधानकारक नाही. गेल्या दीड महिन्यात जिल्ह्यात भाजीपाला पिकविणाऱ्या क्षेत्रात जोरदार पाऊस झाला, त्यामुळे उत्पादन घेता आले नाही. सांगली जिल्ह्यात जयसिंगपूर, दानोळी, कोथळी, नांदणी, अंकली, कागवाड या भागातून मोठ्या प्रमाणात आवक होते, हा पट्टा महापुरात पाण्याखाली गेला. त्यामुळे भाज्यांची आवक मंदावली आहे. आवक घटूनही बाजार मात्र स्थिर आहे.
बॉक्स
भाजीपाल्यांचा पट्टा पाण्याखाली
दानोळी, कोथळी, अंकली, नांदणी येथून मोठ्या प्रमाणात भाज्यांची आवक सांगली-मिरजेच्या बाजारात होते. हा पट्टा महापुरात गेला. चाबूकस्वारवाडी, खटाव, लिंगनूर, सलगरे, करोली, हिंगणगाव, तासगाव येथूनही भरपूर भाज्या बाजारात येतात.
कोट
बाजार बंद असल्याने दारावर येणारी भाजीच घ्यावी लागते. मेथी २० रुपयांच्या खाली मिळत नाही. पावसाळ्यात भाज्या भरपूर असूनही दर मात्र कमी झालेले नाहीत.
- प्रियांका सावंत, गृहिणी, संजयनगर, सांगली
भाज्यांचे दर सतत वाढत आहेत. जुलैमध्ये पावसात आवक थांबल्याने जेवणात डाळी वापरल्या, आता बाजारात भाज्या मिळताहेत; पण सर्वच भाज्यांचे दर २० रुपयांहून अधिक आहेत.
- रोहिणी काटकर, गृहिणी, कवलापूर
ग्राफ
भाज्यांचे भाव सध्याचे (कंसात जुलैमधील)
मेथी २० (१५), पालक १५ (१०), पुदिना ५ (५), कोथिंबीर १५ (१०), बटाटा २० (२०), कांदा ३० (२५), लसूण ८० (७०), टोमॅटो २५ (२०)
कोट
उठाव नसल्याने दर स्थिर
हॉटेल्स, ढाबे बंद असल्याने भाजीपाल्याला अपेक्षित दर नाही. आठवडी बाजारदेखील बंद आहेत, त्यामुळे विक्री थांबली आहे. महिनाभरापासून दर स्थिर आहेत.
- निसार देसाई-डोंगरे, मिरज, भाजीपाला व्यापारी
जुलै महिन्यापासून बाजार चढलेला नाही. आवकदेखील जेमतेम आहे. श्रावण संपल्यानंतर तेजीची अपेक्षा आहे. कांदा, बटाटा, लसूण आदींचे भाव महिन्याभरापासून टिकून आहेत.
- राजेश पोपटानी, व्यापारी, सांगली.