आशियाई बुध्दिबळ स्पर्धेत श्रेया हिप्परगीचे यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:50 AM2020-12-17T04:50:01+5:302020-12-17T04:50:01+5:30
शेगाव : अहमदाबाद येथे झालेल्या दहा वर्षांखालील आशियाई बुद्धिबळ स्पर्धेत जत तालुक्यातील श्रेया हिप्परगी हिने दि्वतीय क्रमांक पटकावला. १९ ...
शेगाव : अहमदाबाद येथे झालेल्या दहा वर्षांखालील आशियाई बुद्धिबळ स्पर्धेत जत तालुक्यातील श्रेया हिप्परगी हिने दि्वतीय क्रमांक पटकावला. १९ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या जागतिक बुद्धिबळ स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे. सध्या ती संख येथील राजारामबापू विद्यालयात पाचवीच्या वर्गात शिकत आहे.
दि. ११ ते १३ डिसेंबरअखेर आंतरराष्ट्रीय आशियाई बुद्धिबळ स्पर्धा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ऑफलाईनऐवजी ऑनलाईन झाली. दहा वर्षाखालील मुलींच्या गटात सातपैकी सहा फेऱ्या जिंकून श्रेयाने दि्वतीय क्रमांक पटकावला. स्पर्धेत आशिया खंडातील २० देशांतील खेळाडू सहभागी झाले होते.
वडील गुरू हिप्परगी यांची मदत व मोबाईल आणि संगणक हेच बुद्धिबळाच्या प्रशिक्षणाचे आणि सरावाचे साधन असलेल्या श्रेयाने जतसारख्या ग्रामीण भागाचे नाव जगाच्या नकाशावर नेले आहे. श्रेया सध्या नागपूरचे आंतरराष्ट्रीय मास्टर अनुप देशमुख यांच्याकडून मार्गदर्शन घेत आहे. वयाच्या सहाव्या वर्षापासून बुद्धिबळाच्या खेळाचे प्राथमिक धडे तिने घेतले. तिला या खेळाची प्रचंड गोडी लागली. त्यानंतर दोन वर्षांत प्रत्येक स्पर्धेत तिने सहभाग घेत यश मिळविले. सांगली येथे झालेल्या जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत सहा प्रतिस्पर्ध्यांवर मात करीत तिने प्रथम, तर राज्य बुद्धिबळ संघामार्फत मुंबईत झालेल्या ७ वर्षे वयोगटातील स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळविला. या स्पर्धेत राज्यातील ७० स्पर्धकांनी भाग घेतला होता. आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत ७ वर्षे वयोगटाखालील एकूण १२५ स्पर्धकांमध्ये श्रेया दुसरी आली. थायलंडमध्ये १ ते १० एप्रिल या कालावधित झालेल्या ८ वर्षाखालील स्पर्धेत आशिया खंडातील ६० स्पर्धकांमधून श्रेयाने रौप्य व कास्यपदकाची कमाई केली. थायलंड व स्पेन येथे झालेल्या स्पर्धेतही तिने यश मिळविले होते.
संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष बसवराज पाटील, उपाध्यक्ष सुभाष पाटील, मुख्याध्यापक व शिक्षकांनी तिचे अभिनंदन केले.
फाेटाे : १६ श्रेया हिप्परगी