सीए परीक्षेत सांगलीची श्रेया ठक्कर देशात दहावी, जिल्ह्यात २९ जणांनी फडकाविला झेंडा 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2024 11:55 AM2024-07-12T11:55:42+5:302024-07-12T11:58:01+5:30

सांगली : मे महिन्यात झालेल्या सनदी लेखापाल ( सीए ) परीक्षेत सांगलीची श्रेया ठक्कर देशात दहाव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली ...

Shreya Thakkar of Sangli stood 10th in the CA exam in the country, 29 people hoisted the flag in the district  | सीए परीक्षेत सांगलीची श्रेया ठक्कर देशात दहावी, जिल्ह्यात २९ जणांनी फडकाविला झेंडा 

सीए परीक्षेत सांगलीची श्रेया ठक्कर देशात दहावी, जिल्ह्यात २९ जणांनी फडकाविला झेंडा 

सांगली : मे महिन्यात झालेल्या सनदी लेखापाल (सीए) परीक्षेत सांगलीची श्रेया ठक्कर देशात दहाव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. या परीक्षेत सांगली जिल्ह्यातील तब्बल २९ विद्यार्थी यशस्वी ठरले आहेत.

सांगलीच्या गेल्या १० वर्षांच्या इतिहासात प्रथमच विक्रमी संख्येने विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, शिवाय पहिल्या दहामध्ये येण्याचा विक्रमही श्रेया ठक्करच्या निमित्ताने झाला आहे. पहिल्या ग्रुपमधून ६६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, त्यापैकी २० उत्तीर्ण झाले. दुसऱ्या ग्रुपमधून परीक्षा दिलेल्या ३७ पैकी १८ विद्यार्थी यशस्वी झाले. दोन्ही ग्रुपमधून ४२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यामध्ये पहिल्या ग्रुपमधून चार, तर दुसऱ्या ग्रुपमधून दोन विद्यार्थी उत्तीर्ण झाले. दोन्ही ग्रुपमध्ये आठ विद्यार्थी यशस्वी झाले.

उत्तीर्ण विद्यार्थी असे : रितेश गंगवाणी, संकेत पवार, रुची चौधरी, ओनिल शहा, लुसिका मेहता, रोहिणी शिंदे, प्राजक्ता पाटील, श्रेया ठक्कर, वीरश्री काणे, श्रुती विभुते, प्रसाद जोशी, श्रेयस पाटील, यशराज आवटे, आदित्य लोखंडे, शर्वरी किर्लोस्कर, जिगर वासानी, ऋतुराज लकडे, रत्नदीप पाटील, वैभव माने, दीपक पाटील, निखिल बदनीकाई, तेजस्विनी सावळे, सलोनी दानोळे, श्रेया जाखोटिया, जयदीप पाटील, सुशांत दौंडे, वल्लभ चव्हाण, अनुज पाटील, सूरज हुलवान.

Web Title: Shreya Thakkar of Sangli stood 10th in the CA exam in the country, 29 people hoisted the flag in the district 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.