शुभांगी बंडगर यांना पीएच.डी.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:32 AM2021-04-30T04:32:42+5:302021-04-30T04:32:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : राजारामनगर (ता. वाळवा) येथील प्रा. शुभांगी बाबासाहेब बंडगर यांनी सादर केलेल्या प्रबंधास मान्यता देत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : राजारामनगर (ता. वाळवा) येथील प्रा. शुभांगी बाबासाहेब बंडगर यांनी सादर केलेल्या प्रबंधास मान्यता देत शिवाजी विद्यापीठाने त्यांना पीएच.डी. पदवी प्रदान केली. शुभांगी बंडगर यांनी श्रीमती कुसुमताई राजारामबापू पाटील कन्या महाविद्यालयातून बी. एस्सी. पदवी घेतली आहे, तर शिवाजी विद्यापीठातून एम. एस्सी करून पीएच. डी. पदवी पटकाविण्याचा विक्रम केला. त्यांनी ‘केमिकल डिपॉझिशन अँड कॅरॅक्टरायझेशन ऑफ नॅनो क्रिस्टल लाईन फेरायट थिन फिल्म्स फॉर देअर एनर्जी अप्लिकेशन’ या विषयावर प्रबंध सादर केला होता. त्यांना प्रा. डॉ. एस. एस. कोळेकर यांचे मार्गदर्शन मिळाले आहे. त्यांचे जागतिक स्तरावर पाच शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. राजारामबापू कारखान्याच्या जत युनिटचे सुरक्षा अधिकारी बाबासाहेब बंडगर यांची ती कन्या आहे. जलसंपदा मंत्री जयंत पाटील, पी. आर. पाटील, विजयराव पाटील यांनी तिचे अभिनंदन केले.