कवलापुरात महाविकास आघाडीच्या शुभांगी नलावडे सरपंच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:24 AM2021-02-12T04:24:40+5:302021-02-12T04:24:40+5:30
बुधगाव : कवलापूर (ता. मिरज) येथील सरपंचपदी महाविकास आघाडीच्या शुभांगी मोहन नलावडे, तर उपसरपंचपदी सौरभ पाटील यांची बिनविरोध निवड ...
बुधगाव : कवलापूर (ता. मिरज) येथील सरपंचपदी महाविकास आघाडीच्या शुभांगी मोहन नलावडे, तर उपसरपंचपदी सौरभ पाटील यांची बिनविरोध निवड झाली.
कवलापूर ग्रामपंचायतीत १७ पैकी ३ जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या. उर्वरित १५ पैकी ११जागा महाविकास आघाडीने जिंकत निर्विवाद यश मिळविले होते. सरपंचपद सर्वसाधारण स्त्रीसाठी राखीव आहे. आघाडीकडून शुभांगी नलावडे, सौरभ पाटील यांनी अर्ज दाखल केले होते. विरोधी गटाकडून मनीषा पाटील आणि शरद पवळ यांनी अर्ज भरले होते. माघारीच्या मुदतीत पाटील व पवळ यांनी अर्ज माघारी घेतले. त्यामुळे निवडणूक बिनविरोध झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विस्तार अधिकारी आर. एल. गुरव यांनी, तर सहायक म्हणून ग्रामविकास अधिकारी सचिन पाटील यांनी काम पाहिले.
याप्रसंगी गटनेते भानुदास पाटील, सदाशिव खाडे, संतोष माळकर, प्रदीप जाधव, कैलास गुंडे उपस्थित होते.
चौकट
सर्वात कमी वयाचे उपसरपंच
जिल्हा विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष असलेल्या पंचवीसवर्षीय सौरभ पाटील यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात जोरदार झाली. उच्चशिक्षित आणि अहोरात्र लोकांसाठी काम करण्याच्या पद्धतीने त्यांच्या गळ्यात उपसरपंचपदाची माळ पडली. कवलापूर ग्रामपंचायतीत सर्वात कमी वयाचा पदाधिकारी म्हणूनही सौरभची नोंद झाली.