श्वेता गायकवाड बनल्या पहिल्या महिला फायरमन, सांगली महापालिकेच्या अग्निशमन दलात रुजू 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2023 04:56 PM2023-03-09T16:56:12+5:302023-03-09T16:56:33+5:30

पिंपरी-चिंचवड महापालिकेत एक वर्ष बजावली आहे सेवा

Shweta Gaikwad becomes first woman fireman, joins fire brigade of Sangli Municipal Corporation | श्वेता गायकवाड बनल्या पहिल्या महिला फायरमन, सांगली महापालिकेच्या अग्निशमन दलात रुजू 

श्वेता गायकवाड बनल्या पहिल्या महिला फायरमन, सांगली महापालिकेच्या अग्निशमन दलात रुजू 

googlenewsNext

सांगली : महापालिकेच्या अग्निशमन दलाकडे पहिल्या महिला फायरमन श्वेता गायकवाड बुधवारी सेवेत रुजू झाल्या. महिलादिनी महापालिकेला पहिल्या महिला फायरमन मिळाल्या.

अग्निशमन विभागाचे प्रमुख विजय पवार यांनी त्यांचे स्वागत केले. श्वेता गायकवाड या मूळच्या सातारा जिल्ह्यातील आहेत. त्यांचे शिक्षण पदवीपर्यंत झाले असून, त्यांनी शासनाच्या अग्निशमन विभागाचे अधिकृत प्रशिक्षण घेतले आहे. त्यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेत एक वर्ष सेवाही बजावली आहे.

महापालिका अग्निशमन विभागाने नुकतेच १५ फायरमन कंत्राटी पद्धतीने सेवेत घेतले आहेत. हे सर्व कर्मचारी बुधवारी रुजू झाले. यात श्वेता या महिला फायरमन आहेत. आयुक्त सुनील पवार, उपायुक्त राहुल रोकडे आणि विजय पवार यांनी त्यांचे अभिनंदन केले. फायरमन व आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली आहे.

Web Title: Shweta Gaikwad becomes first woman fireman, joins fire brigade of Sangli Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली