प्रांत,तहसीलदारांच्या समोर जयंत पाटील यांचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2019 05:15 PM2019-07-08T17:15:17+5:302019-07-08T17:25:57+5:30
महसूल विभागाच्या तलाठी आणि इतर कनिष्ठ कार्यालयात वजन ठेवल्याशिवाय सामान्य नागरिकांची कामे होत नसल्याच्या तक्रारी आहेत,येत्या महिन्याभरात यामध्ये सुधारणा झाली नाही तर आम्हाला तुमच्या दारात यावे लागेल असा सज्जड इशारा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी दिला.यावेळी विशेष म्हणजे यावेळी प्रांताधिकारी आणि तहसीलदार उपस्थित होते.
इस्लामपूर: महसूल विभागाच्या तलाठी आणि इतर कनिष्ठ कार्यालयात वजन ठेवल्याशिवाय सामान्य नागरिकांची कामे होत नसल्याच्या तक्रारी आहेत,येत्या महिन्याभरात यामध्ये सुधारणा झाली नाही तर आम्हाला तुमच्या दारात यावे लागेल असा सज्जड इशारा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी दिला.यावेळी विशेष म्हणजे यावेळी प्रांताधिकारी आणि तहसीलदार उपस्थित होते.
७/१२ उताऱ्यातील ऑनलाइन नोंदीत झालेल्या चुका, रेशन धान्य मिळत नाही,जमीन खरेदीच्या नोंदी प्रलंबित आहेत,शेत जमिनीची मोजणी होत नाही यासारख्या तक्रारी शेतकरी आणि सामान्य जनतेकडून आल्या होत्या. त्याची दखल घेत आमदार पाटील यांनी राष्ट्रवादीच्या वतीने आज तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.यावेळी पी.आर.पाटील,तालुकाध्यक्ष विजय पाटील,शहराध्यक्ष शहाजी पाटील,युवकचे अध्यक्ष संग्रामसिंह पाटील, जेष्ठ नेते विष्णुपंत शिंदे,बाळासाहेब पाटील,नेताजीराव पाटील उपस्थित होते.
आ. पाटील म्हणाले,सामान्य माणसाच्या कामात राजकारण करू नका.कोणतरी सांगते म्हणून,तर कुणा कडून पैसे घेऊन कामे करण्याची पद्धत बंद करा.प्रशासनाने न्याय्य पद्धतीने काम करावे.जनतेच्या महसूल खत्याविषयी तीव्र भावना आहेत.त्याची दखल घेत येत्या महिन्यात सर्व प्रलंबित कामे मार्गी लावा अशी सूचना प्रशासनाला केली.
प्रांत नागेश पाटील यांनी,आलेल्या सर्व सूचनांवर गांभीर्याने विचार करून साम्यान नागरिकांना त्रास झाल्याचे निदर्शनास आल्यास कठोर कारवाई करू असे आश्वासन दिले.तसेच सर्व प्रलंबित कामे निर्गत करताना एका मदत कक्षाची स्थापना करून सर्वांच्या सहकार्याने काम करू असे स्पष्ट केले.