जिल्ह्यात ९ जानेवारीपर्यंत पावसाची चिन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:25 AM2021-01-08T05:25:02+5:302021-01-08T05:25:02+5:30
सांगली : जिल्ह्यात ढगांची दाटी कायम असून येत्या ९ जानेवारीपर्यंत पावसाची शक्यता कायम आहे. दुसरीकडे कमाल तापमानात घट झाली ...
सांगली : जिल्ह्यात ढगांची दाटी कायम असून येत्या ९ जानेवारीपर्यंत पावसाची शक्यता कायम आहे. दुसरीकडे कमाल तापमानात घट झाली असून आगामी चार दिवस वातावरण असेच राहणार आहे.
भारतीय हवामान खात्याने नोंदविलेल्या निरीक्षणानुसार जिल्ह्यात ९ जानेवारीपर्यंत पावसाची चिन्हे आहेत. विजांच्या कडकडाटासह जिल्ह्याच्या काही भागात पावसाची चिन्हे आहेत. सोमवारी रात्रीही शहराच्या अनेक भागांसह ग्रामीण भागातही पाऊस झाला. अवकाळी पावसामुळे द्राक्षबागायतदार हवालदिल झाले आहेत. सोमवारच्या तुलनेत मंगळवारी ढगांची दाटी कमी झाली. दुपारी काहीकाळ सूर्यदर्शन झाले. सायंकाळी पुन्हा ढगांनी गर्दी केली.
बुधवारी ६ जानेवारीपासून शनिवारपर्यंत दररोज ढगांची दाटी राहणार आहे. दुपारी किंवा सायंकाळी विजांच्या कडकडाटासह काहीठिकाणी पावसाची चिन्हे आहेत. तुरळक स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. काहीठिकाणी केवळ ढगांची दाटी राहणार आहे.
धुक्यांचेही आगमन
हवामान खात्याच्या अंदाजानुसार १० व ११ जानेवारीस जिल्ह्याच्या काही भागात विरळ धुके अनुभवास येतील. या दोन्ही दिवशी अंशत: ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.