सांगलीतील कुरळपच्या मैदानात इराणी पैलवानाशी भिडणार सिकंदर शेख

By श्रीनिवास नागे | Published: April 4, 2023 03:55 PM2023-04-04T15:55:57+5:302023-04-04T15:57:41+5:30

महिला कुस्त्यांसह राज्यभरातील नामांकित मल्लांच्या कुस्त्या होणार

Sikandar Shaikh will fight against an Iranian wrestler in Sangli's Kurlap ground | सांगलीतील कुरळपच्या मैदानात इराणी पैलवानाशी भिडणार सिकंदर शेख

सांगलीतील कुरळपच्या मैदानात इराणी पैलवानाशी भिडणार सिकंदर शेख

googlenewsNext

कुरळप (जि. सांगली) : कुरळप (ता. वाळवा) येथील ग्रामदैवत हनुमानाच्या यात्रेत आंतरराष्ट्रीय कुस्त्यांचे मैदान आयोजित केले असून इराणचा मल्ल अली मेहरी याच्याशी कोल्हापूरच्या सिकंदर शेखची पहिल्या क्रमांकाची लढत होणार आहे. विजेत्यास बुलेट गाडी, चांदीची गदा व रोख रकमेचे इनाम देणार असल्याची माहिती यात्रा कमिटीचे अध्यक्ष अशोक पाटील यांनी दिली.

ते म्हणाले की, शुक्रवार, दि. ७ एप्रिल रोजी यात्रेच्या दुसऱ्या दिवशी राज्य कुस्तीगीर परिषद व जिल्हा आणि शहर राष्ट्रीय तालीम संघ यांच्या मान्यतेने कुस्त्यांचे मैदान होणार आहे. दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती उपमहाराष्ट्र केसरी गणेश जगताप विरुद्ध राष्ट्रीय चॅम्पियन अक्षय शिंदे (पुणे) यांच्यात, तर तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती मोतीबाग तालीम मंडळाचा महाराष्ट्र चॅम्पियन अरुण बोंगाडे विरुद्ध महाराष्ट्र चॅम्पियन विक्रम शेटे यांच्यात होणार आहे. मैदानात महिला कुस्त्यांसह राज्यभरातील नामांकित मल्लांच्या कुस्त्या होणार आहेत.

कुरळपला ग्रामदैवताची यात्रा भरवण्याचा मान ग्रामपंचायतीतील सत्ताधारी गटाला मिळाला असून, सत्ताधारी गटाने यात्रेची जय्यत तयारी केली आहे. विविध कार्यक्रमांचे आयोजन करून यात्रा यशस्वीपणे पार पडणार असल्याचे अशोक पाटील यांनी सांगितले.

Web Title: Sikandar Shaikh will fight against an Iranian wrestler in Sangli's Kurlap ground

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.