सिंगल बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:25 AM2021-01-08T05:25:59+5:302021-01-08T05:25:59+5:30

सांगली : गत दोन दिवसांमध्ये वातावरणात झालेल्या बदलांमुळे जिल्ह्यातील फळबागांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे ...

Single news | सिंगल बातम्या

सिंगल बातम्या

Next

सांगली : गत दोन दिवसांमध्ये वातावरणात झालेल्या बदलांमुळे जिल्ह्यातील फळबागांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे शेतकरी बागांवर औषध फवारणी करण्यात व्यस्त असल्याचे सध्या सर्वत्र दिसून येत आहे.

-------------------

चोरीच्या घटनांमुळे नागरिकांत भीती

शिराळा : शिराळा शहरासह तालुक्यातील चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. घरे, दुकाने फोडून रोख रकमेसह वस्तू चोरी केल्या जात आहेत. या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस प्रशासनाने चोरांचा वेळीच बंदोबस्त करून नागरिकांना भयमुक्त करण्याची मागणी तालुक्यातून केली जात आहे.

---------------------

कवलापूर-कुमठे फाटा मार्गावर वाहतूक कोंडी

माधवनगर : सध्या ऊस वाहतुकीचा हंगाम सुरू असल्याने मिरज तालुक्यातील कवलापूर ते कुमठे फाटा या मार्गावर वाहतुकीची कोंडी वारंवार होत आहे. नियम मोडून वाहन चालविणाऱ्या वाहनधारकांमुळे या समस्येत भरच पडत आहे. तसेच वेगवान वाहनांमुळे अपघाताचा धोका वाढत आहे.

------------------------

दुधगाव परिसरात ऊस तोडणीची प्रतीक्षा

दुधगाव : मिरज तालुक्यातील दुधगाव, कवठेपिरान परिसरात ऊस तोडणीचा हंगाम धीम्या गतीने सुरू आहे. ऊस तोडणी मजुरांच्या टोळ्या कमी असल्याने ही समस्या जाणवत आहे. सध्या ऊस तोडणी पूर्ण करण्यासाठी सर्व साखर कारखाना प्रशासनाची कसरत सुरू आहे.

------------------

पाणंद रस्त्यांच्या दुरुस्तीची मागणी

बागणी : बागणी (ता. वाळवा) येथे ऊस शेतीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहेत. सध्या ऊस तोडणी सुरू असल्याने अनेक ठिकाणी पाणंद रस्त्यांची उत्तम व्यवस्था नसल्याने वाहनधारकांची मोठी कसरत होत आहे. यामुळे या रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.

--------------------

आष्टा-वडगाव रस्ता पूर्ण करण्याची मागणी

शिगाव : सध्या आष्टा ते पेठवडगाव मार्गाचे काम सुरू आहे. मात्र हे काम धीम्या गतीने सुरू असल्याने वाहनधारकांना अनेक ठिकाणी अडथळे येत आहेत. या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याने हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी परिसरातील वाहनधारकांतून केली जात आहे.

Web Title: Single news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.