सिंगल बातम्या हॅलो चार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:06 AM2021-01-13T05:06:52+5:302021-01-13T05:06:52+5:30

आष्टा : शहरातील सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर कारवाई केली जावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारच्या वर्तनामुळे ...

Single News Hello Four | सिंगल बातम्या हॅलो चार

सिंगल बातम्या हॅलो चार

Next

आष्टा : शहरातील सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर कारवाई केली जावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारच्या वर्तनामुळे आरोग्यच्या समस्या निर्माण होत आहेत. याबाबत नागरिकांमध्ये जागृती करण्याची गरज आहे.

----------------------

रेल्वे स्थानकात स्वच्छतेची मागणी

सांगली : सांगली रेल्वे स्थानक परिसरात बेजबाबदार नागरिकांकडून कुठेही कचरा टाकून घाण केली जात आहे. अशा प्रवाशांवर कारवाई केली जावी. तसेच रेल्वे प्रशासनाने स्वच्छतेबाबत योग्य ती खबरदारी घेण्याची मागणी होत आहे.

---------------

खरीप पिकांची जोमात वाढ

कुरळप : कुरळप (ता. वाळवा) परिसरात सध्या खरीप हंगामातील पिकांची जोमात वाढ आहे. शेतकरी भांगलणीसह अंतर्गत मशागतीच्या कामात व्यस्त आहेत. पिकांना खते देण्याचेही नियोजन केले जात आहे.

-------------

मजुरांची टंचाई

मिरज : खरीप हंगामातील पिकांच्या अंतर्गत मशागतींची कामे सध्या जोमात सुरू आहेत. शिवाय द्राक्षबागांमध्येही विविध कामांना गती आहे. अशावेळी मजूर टंचाईची समस्या मिरज तालुक्यातील काही गावांमध्ये दिसून येत आहे.

Web Title: Single News Hello Four

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.