ढालगावमध्ये सहा हातभट्टी दारूअड्डे उद्ध्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:19 AM2021-06-17T04:19:12+5:302021-06-17T04:19:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : ढालगाव (ता. कवठेमहांकाळ) परिसरात ओढ्याकाठी सुरू असलेले बेकायदेशीर हातभट्टी दारू निर्मिती अड्डे राज्य उत्पादन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : ढालगाव (ता. कवठेमहांकाळ) परिसरात ओढ्याकाठी सुरू असलेले बेकायदेशीर हातभट्टी दारू निर्मिती अड्डे राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने उद्ध्वस्त केले. या परिसरात असलेल्या एकूण सहा ठिकाणी कारवाई करीत पथकाने एक लाख ७७ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दरम्यान, एकाचवेळी सहाठिकाणी कारवाई करण्यात आली असून आता यापुढेही कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा राज्य उत्पादन शुल्कच्या अधीक्षक संध्याराणी देशमुख यांनी दिला आहे.
जिल्ह्यात सुरू असलेल्या बेकायदेशीर दारू निर्मिती अड्ड्यांवर कारवाई करण्यासाठी राज्य उत्पादनच्या सांगली, मिरज, विटा उपविभागाने भरारी पथके तयार केली आहेत. या पथकाला ढालगाव येथे ओढ्याकाठी हातभट्टी दारू तयार केली जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने छापा टाकून ७६०० लीटर रसायन नष्ट केले. या कारवाईत एक लाख ७७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अधीक्षक संध्याराणी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने ही कारवाई केली.