कोरोनाग्रस्त देशांतून ९ जण सांगलीत परतले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2020 10:19 PM2020-03-01T22:19:12+5:302020-03-01T22:19:17+5:30
सांगली : कोरोनाबाधित देशांतून नऊ प्रवासी सांगली व मिरजेत परतले आहेत. त्यांच्यासंदर्भात योग्य ती काळजी घेण्याच्या सूचना जिल्हा शल्यचिकित्सक ...
सांगली : कोरोनाबाधित देशांतून नऊ प्रवासी सांगली व मिरजेत परतले आहेत. त्यांच्यासंदर्भात योग्य ती काळजी घेण्याच्या सूचना जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा परिषदेच्या आरोग्याधिकाऱ्यांनी महापालिकेला दिल्या आहेत. मिरजेत सात व सांगलीत दोघे प्रवासी परतले आहेत.
जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. भूपाल गिरीगोसावी आणि शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्याधिकाऱ्यांना पत्राद्वारे सूचना केली आहे. त्यानुसार सांगलीत दोन व मिरजेत सात प्रवासी परतले आहेत. कोरोनाबाधित देशांत त्यांचा निवास होता. त्यांची माहिती राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी जिल्हा आरोग्याधिकाºयांना दिली. हे सर्व रहिवासी महापालिका क्षेत्रातील असल्याने पुढील काळजी घेण्याची व कार्यवाहीची जबाबदारी महापालिका वैद्यकीय आरोग्याधिकाºयांवर सोपविण्यात आली. त्यांना १४ दिवस देखरेखीखाली ठेवावे व आवश्यकतेनुसार आयसोलेशन (विलगीकरण) कक्षात ठेवावे, अशी सूचना केली आहे. आवश्यकतेनुसार सांगलीत शासकीय रुग्णालयात प्रतिबंधात्मक उपचार द्यावेत. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनाही काळजी घेण्यासंदर्भात मार्गदर्शन करावे, असे सांगितले आहे. त्याचा अहवाल दररोज राज्यस्तरावर पाठविण्यात येणार आहे.
दरम्यान, महापालिकेचे वैद्यकीय आरोग्याधिकारी डॉ. संजय कवठेकर म्हणाले, बाहेरील देशांतून आलेल्या प्रवाशांची नोंद आम्ही घेतली आहे. या सर्वांना विमानतळावरच योग्य प्रतिबंधात्मक उपचार दिले आहेत. १४ दिवस वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. यासंदर्भातील अहवाल अरोग्याधिकाºयांना पाठविला आहे. नागरिकांच्या जागृतीसाठी पत्रके छापून वाटण्यात आली आहेत. आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक ती सर्व काळजी प्रशासन घेत आहोत. सांगलीत कोठेही कोरोनासंदर्भात काळजीची परिस्थिती नसल्याने नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन त्यांनी केले.
सातजण मिरजेचे, दोघे सांगलीचे
मिरजेत तासगाव वेस, किल्ला भाग, हायस्कूल रस्ता, कृष्णाघाट रस्ता, नदीवेस, पंढरपूर रस्ता तसेच सांगलीत शंभर फुटी परिसरात हे नऊजण राहण्यास अहेत. ते नुकतेच कोरोनाबाधित देशांतून परतल्याचे आरोग्याधिकाºयांनी पत्रात म्हटले आहे.