फळ मार्केटमध्ये शेडचा सांगाडा कोसळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:22 AM2020-12-26T04:22:25+5:302020-12-26T04:22:25+5:30
फळ मार्केटमध्ये नव्याने गाळे उभारणीसाठी बाजार समितीने जागा दिली आहे. त्या ठिकाणी पत्र्याचे तात्पुरते गाळे (शेड) उभारण्यात येत आहेत. ...
फळ मार्केटमध्ये नव्याने गाळे उभारणीसाठी बाजार समितीने जागा दिली आहे. त्या ठिकाणी पत्र्याचे तात्पुरते गाळे (शेड) उभारण्यात येत आहेत. काही गाळ्यांचे काम पूर्ण झाले आहे, तर काहींचे सुरू आहे. यांपैकीच काही गाळ्यांसाठी लोखंडी सांगाडा उभा केला होता. तो भक्कम राहावा यासाठी जमिनीत सिमेंट-काँक्रीट ओतण्यासाठी खड्डे काढले होते. त्यामुळे हा सांगाडा कमकुवत झाला होता. शुक्रवारी सकाळी तो कोसळला. सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही.
फळ मार्केटमध्ये नव्याने तयार करण्यात येत असणाऱ्या या गाळ्यांवरून गेले काही दिवस वाद सुरू आहे. तो अद्यापही शमलेला नाही. या परिस्थितीत गाळे उभारणीसाठी तयार करण्यात आलेला सांगाडाच पडल्याने उलट-सुलट चर्चा रंगली. मात्र हा सांगाडा पाडला नाही तर पडला आहे, हे स्पष्ट झाल्यानंतर सर्व चर्चा थांबली.