सांगलीतील रिलायन्स ज्वेलवरील 14 कोटींच्या धाडसी दरोड्याप्रकरणी संशयितांची रेखाचित्रे जारी
By संतोष भिसे | Published: June 8, 2023 03:31 PM2023-06-08T15:31:11+5:302023-06-08T15:33:59+5:30
सांगलीतील रिलायन्स ज्वेलवरील धाडसी दरोड्याप्रकरणी चार दरोडेखोरांची रेखाचित्रे पोलिसांनी गुरुवारी जारी केली.
सांगली : सांगलीतील रिलायन्स ज्वेलवरील धाडसी दरोड्याप्रकरणी चार दरोडेखोरांची रेखाचित्रे पोलिसांनी गुरुवारी जारी केली. या दरोड्यात 14 कोटींच्या सोने-डायमंड लूट आणि 67 हजाराची दरोड्याखोरांकडून लूट करण्यात आली होती. दरोडेखोरांनी वापरलेली मोटार पोलिसांनी त्याच दिवशी जप्त केली होती. आज या मोटारीमधील वस्तूची कोल्हापुरातील पथककडून न्याय वैद्यक नमुने घेण्यात आले.
संशयितांची माहिती मिळाल्यास संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. संशयितांची माहिती देणाऱ्यांची नावे गोपनीय ठेवली जातील, असे पोलिस उपाधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी केले आहे.
दरोडा टाकल्यानंतर गुन्ह्यात वापरलेले चारचाकी सफारी वाहन भोसे गावातील शेतात टाकून दरोडेखोर फरार झाले होते. त्यातून दोन रिवाल्वरही पोलिसांनी जप्त केले. दरोडेखोरांची महत्वाची कागदपत्रेही पोलिसांच्या हाती लागली आहेत. या सर्वांची न्यायवैद्यक चाचणी केली जात आहे. भोसे वस्ती येथील संजय चव्हाण यांच्या शेताच्या बांधावर गाडी व साहित्य आढळून आले होते.