सांगली जिल्ह्यातील कडेगावात मोहरामनिमित्त गगनचुंबी ताबूतांच्या भेटी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 03:15 PM2018-09-21T15:15:20+5:302018-09-21T15:28:41+5:30

हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून संपूर्ण देशात प्रसिद्ध असलेला व तब्बल २०० वर्षाची परंपरा असलेल्या  कडेगाव येथील मोहरमच्या ताबूत भेटीचा दिमाखदार  व डोळ्यांचे पारणे फेडणारा  सोहळा शुक्रवारी हजारो  भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

Skyscraper visits in the city of Sangagaal in Sangigali district | सांगली जिल्ह्यातील कडेगावात मोहरामनिमित्त गगनचुंबी ताबूतांच्या भेटी  

सांगली जिल्ह्यातील कडेगावात मोहरामनिमित्त गगनचुंबी ताबूतांच्या भेटी  

googlenewsNext
ठळक मुद्देसांगली जिल्ह्यात हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश डोळयांचे पारणे फेडणारा सोहळा संपन्न 

कडेगाव :हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून संपूर्ण देशात प्रसिद्ध असलेला व तब्बल २०० वर्षाची परंपरा असलेल्या सांगली जिल्ह्यातील कडेगाव येथील मोहरमच्या ताबूत भेटीचा दिमाखदार  व डोळ्यांचे पारणे फेडणारा  सोहळा शुक्रवारी  हजारो  भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

महान भारत देश आपला घुमऊ जय जय कार ,प्यारा प्यारा हमारा देश प्यारा, अब एकीका कर दो पुकारा’ ‘हिंदू-मुस्लिम साथ रहेंगे, एकीसे सागर पार करेंगे’ या ऐक्याच्या तसेच देशभक्तीपर गीतांनी व संदेशानी परिसर दुमदुमून गेला.

या हुसेन दुला,या इमामो दुला अशा गजरात मोहरमनिमित्त येथे १२५  ते १५० फूट उंचीच्या गगनचुंबी ताबूतांच्या भेटी सुरेश बाबा देशमुख मोहरम  चौक येथे संपन्न  झाल्या.  हा सोहळा पाहण्यासाठी महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातून हजारो  भाविक आले होते. विशेषतः सांगली , सातारा, कोल्हापूर, सोलापूर ,पुणे जिल्ह्यातील भाविकांची मोठी गर्दी होती.

सकाळी नऊ वाजता शिवाजीनगर, निमसोड, सोहोली, कडेपूर ,नेर्ली आदी गावातील मानकऱ्यांना वाजत-गाजत ताबूताच्या ठिकाणी आणण्यात आले. त्यानंतर पूजा करून मानाचा सातभाई यांचा उंच ताबूत सकाळी ११.४५ वाजता उचलण्यात आला. येथून भेटी सोहळ्यास प्रारंभ झाला.

हा ताबूत विजबोर्डजवळ येऊन थांबला. तेथे देशपांडे, हकीम, शेटे यांचे ताबूत येऊन मिळाले. हे सर्व ताबूत पाटील चौकात  आणण्यात आले. त्यानंतर बागवान यांचा उंच, आत्तार, शेटे यांचे ताबूत पाटील चौकात आणण्यात आले. त्यानंतर सातभाई पाटील, सातभाई बागवान, सातभाई आत्तार ,सातभाई हकीम,या उंच ताबूतांच्या भेटी दुपारी सव्वाबाराला झाल्या.

त्यानंतर हिंदू मानकऱ्यांमार्फत मसूदमाला ताबूत व पंजे, बारा इमामचे पंजे, नालसाहेब यांचे पंजे , तांबोळी ,इनामदार व सुतार यांचे ताबूत आणले गेले. सर्व ताबूत माना प्रमाणे सुरेश बाबा देशमुख -मोहरम चौकात  एकत्रित केले गेले. त्यानंतर दुपारी दीडला ताबूत उचलण्यात आले व मुख्य भेटीचा सोहळा सुरू झाला. डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या या  नेत्रदीपक  सोहळ्यात गगनचुंबी ताबूत पाहून भाविक अक्षरशः मंत्रमुग्ध  झाले होते . या ठिकाणी मानाप्रमाणे सर्व ताबूतांच्या भेटी झाल्या.

आमदार विश्वजीत कदम , जि.प .अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख , जि. प .सदस्य शरद लाड, युवा नेते डॉ. जितेश कदम, पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, तहसीलदार अर्चना शेटे, डी.वाय .एस .पी. अमरसिंह निंबाळकर, भाजप राज्य सरचिटणीस राजाराम गरुड, नगराध्यक्षा आकांक्षा जाधव, जेष्ठनेते चंद्रसेन देशमुख, सुरेश निर्मळ, युवा नेते  हर्षवर्धन कदम, युवक काँग्रेसचे राज्य सचिव इंद्रजित साळुंखे, नगरपंचायतचे मुख्याधिकारी चरण कोल्हे, उपनगराध्यक्ष साजिद पाटील आदी उपस्थित होते

Web Title: Skyscraper visits in the city of Sangagaal in Sangigali district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.