चांदोली पाणलोट क्षेत्रात धुवॉँधार पाऊस, २४ तासांत पाणीसाठ्यात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 08:25 PM2018-06-26T20:25:44+5:302018-06-26T20:30:08+5:30
चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी होत असून, गेल्या २४ तासांत १७० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
वारणावती : चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी होत असून, गेल्या २४ तासांत १७० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून येणाऱ्या पाण्याची आवक वाढल्याने धरणातील पाणी साठ्यात १५.७५ दशलक्ष घनमीटरने वाढ झाली आहे.
शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागातील चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. सोमवारी दिवसभर पावसाचा जोर वाढल्याने पाणलोट क्षेत्रातून येणाºया पाण्याची आवक वाढली आहे. पाण्याची पातळी ०.८० मीटरने वाढली आहे, तर पाणीसाठा १५.७५ दशलक्ष घनमीटरने वाढला आहे. धरणात सध्या १४.४२ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.गेल्या २४ तासांत १७० मिलिमीटर पावसासह एकूण ३५३ मिलिमीटर पावसाची नोंद वारणावती येथील पर्जन्यमापकावर झाली आहे.गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे डोंगरदºयातून धबधबे कोसळत आहेत. उखळू येथील अतिदुर्गम भागातील धबधबा कोसळू लागल्याने पर्यटकांसाठी आकर्षण ठरत आहे. धबधबे व हिरवाईने नटलेला निसर्ग पाहण्याचा मुक्त आनंद पर्यटक लुटत आहेत.
मुसळधार पावसामुळे शेतात पाणी तुंबल्याने शेतीची कामे खोळंबली आहेत. भुईमूग, नाचणी, वरी यासारखी पिके पेरता येत नाहीत. तर हा पाऊस भात व ऊस पिकांना उपयुक्त आहे.
चांदोली धरणातील पाणीसाठा.
उखळू (ता. शाहूवाडी) येथील कोसळणारा धबधबा.