आसदमध्ये घडली साप-माशाची झुंज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:25 AM2021-03-28T04:25:04+5:302021-03-28T04:25:04+5:30

अतुल जाधव देवराष्ट्रे : भांडणात कोण कोणाला भारी पडेल, हे कोणीही सांगू शकत नाही. अशीच घटना आसद (ता. कडेगाव) ...

A snake-fish fight took place in Assad | आसदमध्ये घडली साप-माशाची झुंज

आसदमध्ये घडली साप-माशाची झुंज

Next

अतुल जाधव

देवराष्ट्रे : भांडणात कोण कोणाला भारी पडेल, हे कोणीही सांगू शकत नाही. अशीच घटना आसद (ता. कडेगाव) येथे घडली. साप व माशाच्या तासभर चाललेल्या लढतीत अखेर वीतभर मासा जिद्दीला पेटला व पाण्यातून बाहेर पडून भल्यामोठ्या सापाचे तोंड स्वतःच्या तोंडातून सोडले नाही. यात दोघांनाही जीव गमवावा लागला.

चिंचणी तलावाच्या पोट कालव्यात नेहमी पाणी असल्याने येथे लहान- मोठे मासे कायमच असतात. त्याची शिकार करण्यासाठी मोर, बगळे, सापही या कालवा परिसरात मोठ्या प्रमाणात आढळून येतात. धामण जातीचा भलामोठा साप माशाची शिकार करण्यासाठी कालव्यात गेला; पण सापाचा शिकारीचा डाव फसला व माशाने सापावर हल्ला करत सापाचे तोंड माशाच्या तोंडात फसले. मग काय सापाची जीव वाचविण्यासाठी धडपड चालू झाली. पाण्यात अर्धा पाऊण तास झटkपट झाली; पण माशाने सापाचे तोंड सोडले नाही.

सापाने सरकत माशाला जमfनीवर आणले तसा मासा तडफडू लागला; पण सापाला सोडले नाही. अखेर पाण्याविना माशाचा जीव गेला. तरीही सापाला मासाच्या तोंडात अडकलेले तोंड निघले नाही. अखेर सापाचाही त्यात मृत्यू झाला. तासभर चाललेल्या लढतीत अखेर दोघांचाही मृत्यू झाला.

Web Title: A snake-fish fight took place in Assad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.