सोशल मीडियामुळे कौटुंबिक स्वास्थ्य बिघडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:27 AM2021-03-10T04:27:44+5:302021-03-10T04:27:44+5:30
शिरटे : सोशल मीडियाचा वाढता अतिरेक कौटुंबिक स्वास्थ्य बिघडण्यासाठी घातक ठरत आहे. कौटुंबिक वातावरण आनंदी ठेवण्यासाठी नातेसंबंध टिकवून एकमेकांशी ...
शिरटे : सोशल मीडियाचा वाढता अतिरेक कौटुंबिक स्वास्थ्य बिघडण्यासाठी घातक ठरत आहे. कौटुंबिक वातावरण आनंदी ठेवण्यासाठी नातेसंबंध टिकवून एकमेकांशी संवाद वाढवायला हवा. यासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन प्रा. विनोद मोहिते यांनी केले.
भवानीनगर (ता. वाळवा) येथे सांगली जिल्हा बँक व मातृभूमी महिला विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात प्रा. मोहिते बोलत होते. बँकेचे शाखाप्रमुख अजित पवार अध्यक्षस्थानी होते. वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल गौर, सुवर्णा कांबळे, सागर चव्हाण उपस्थित होते. यावेळी अंकिता सावंत, सागर चव्हाण यांची भाषणे झाली. वनिता मोहिते यांनी स्वागत केले. स्वाती मोहिते यांनी सूत्रसंचालन केले.
संस्था अध्यक्षा वनिता मोहिते, सचिव सुवर्णा गोंदील, संचालिका - सरस्वती पाटील, सुषमा सुतार, धनश्री राजहंस, शोभा दांड, इंदुताई ताटे, सुमन रसाळ, लता गोडसे यांनी संयोजन केले.
यावेळी वनिता मोहिते, प्रियांका तांदळे, स्वाती मोहिते, सुवर्णा गोंदील, वंदना मोहिते यांचा सत्कार झाला.
वैशाली सिंहासने, संध्या पाटील, सुजाता सोनवले, आशा सावंत, प्रतिभा मोहिते, अनिता मोहिते, यास्मीन तांबोळी, चैताली चव्हाण, रंजना चंद उपस्थित होत्या.