नाना पाटील, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची समाजाला गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 04:20 AM2020-12-07T04:20:06+5:302020-12-07T04:20:06+5:30
वाळवा : क्रांतिसिंह नाना पाटील व भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची आजच्या काळात खूप गरज आहे, असे प्रतिपादन ...
वाळवा : क्रांतिसिंह नाना पाटील व भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची आजच्या काळात खूप गरज आहे, असे प्रतिपादन हुतात्मा साखर कारखाना अध्यक्ष वैभव नायकवडी यांनी केले.
वाळवा येथे किसान शिक्षण संस्थेच्या हुतात्मा विद्यालयाच्या प्रांगणात क्रांतिसिंह नाना पाटील स्मृतिदिन व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन कार्यक्रमात ते बोलत होते. नायकवडी यांच्याहस्ते प्रतिमापूजन करून पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.
नायकवडी म्हणाले, देशात महाराष्ट्र अग्रेसर आहे, कारण इथे शाहू, फुले, आंबेडकर, नाना पाटील व डाॅ. नागनाथअण्णा यांनी महाराष्ट्राची वैचारिक मशागत केली आहे. त्यांचे स्मृतिदिन साजरे करणे म्हणजे त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचविणे हा उद्देश होय.
यावेळी मुख्याध्यापक मधुकर वायदंडे व मुख्याध्यापिका व्ही. के. चेंडके, सुरेश खणदाळे, एस. आर. पाटील प्रमुख उपस्थित होते.
फाेटाे : ०६ वाळवा १
ओळ :
वाळवा येथे वैभव नायकवडी यांच्या उपस्थितीत क्रांतिसिंह नाना पाटील. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.