समाजाने ‘कृष्णाकाठ’चा अभ्यास करावा

By admin | Published: March 24, 2017 11:40 PM2017-03-24T23:40:54+5:302017-03-24T23:40:54+5:30

अप्पासाहेब खोत : वडगाव हवेलीत यशवंतराव चव्हाण जयंतीनिमित्त कार्यक्रम

The society should study 'KrishnaKath' | समाजाने ‘कृष्णाकाठ’चा अभ्यास करावा

समाजाने ‘कृष्णाकाठ’चा अभ्यास करावा

Next



वडगाव हवेली : ‘आजच्या राजकीय परिस्थितीत यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांची होत असलेली पायमल्ली घृणास्पद आहे. आजच्या समाजाने ज्ञानेश्वरी बरोबरच ‘कृष्णाकाठ’चाही अभ्यास करावा,’ असे मत प्रसिद्ध ज्येष्ठ कथाकथनकार अप्पासाहेब खोत यांनी व्यक्त केले.
वडगाव हवेली, ता. कऱ्हाड येथील ग्रामस्थ व सेवाभावी संस्थांच्या वतीने यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कऱ्हाड अर्बन कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी होते. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले, बाजार समितीचे माजी सभापती शिवाजीराव जाधव, कृष्णेचे संचालक दयानंद पाटील, जितेंद्र पाटील, धोंडिराम जाधव, निवासराव थोरात, पांडुरंग होणमाने, कऱ्हाडचे उपनगराध्यक्ष जयवंतराव पाटील, माजी नगराध्यक्षा शारदा जाधव, जगदीश जगताप, विशाल पवार, जिल्हा परिषद सदस्या प्रियांका ठावरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
खोत म्हणाले, ‘यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा वसा व वारसा आजही या परिसरात जोपासला जातो. प्रत्येकाने आपल्या जीवनात संयम नावाची गोष्ट जवळ ठेवावी. यशवंतराव यांच्याकडे ती पराकोटीने होती म्हणूनच ते घडले. चव्हाण यांनी सुरू केलेली ईबीसी सवलत योजना आज नसती तर आजच्या पिढीला शैक्षणिक प्रगती करता आलीच नसती. त्यांनी मातेबरोबरच मातीवरही प्रेम केले. जो माणूस मातीशी इमानी राहतो तो जीवनात कधीही अयशस्वी होत नाही. आजच्या मुलांना थोर लोकांचे जीवनचरित्र वाचण्यास द्यावी व मुलांअगोदर ती पालकांनी आत्मसात करावी. त्यांचा आदर्श नेहमीच स्मरणात राहावा ही काळाची गरज आहे.’
यावेळी सुभाषराव जोशी, जगदीश जगताप आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच कार्यक्रमात कऱ्हाड तालुक्यातील नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक तसेच येथील विविध क्षेत्रात यशस्वी झालेल्या गुणवंत खेळाडू व विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमास पंचायत समिती सदस्य बाळासाहेब निकम, सुहास पवार, चंद्रकांत मदने, जयश्री जाधव, मनीषा पाटील, अर्चना गायकवाड, सरपंच शंकर ठावरे, शिवराज जगताप, सत्यवान जगताप, धनंजय जगताप, बाळासाहेब जगताप, जे. के. जगताप, सुभाष जगताप आदींसह परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: The society should study 'KrishnaKath'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.