डोंगरी भागातील सर्व प्रश्न सोडवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:25 AM2021-09-13T04:25:36+5:302021-09-13T04:25:36+5:30
कोकरूड : डोंगरी भागातील पाणी, शिक्षण, आरोग्य आदी प्रश्नांसाठी चळवळ उभी केली; तरच आपले प्रश्न मार्गी लागतील. मागली पिढी ...
कोकरूड : डोंगरी भागातील पाणी, शिक्षण, आरोग्य आदी प्रश्नांसाठी चळवळ उभी केली; तरच आपले प्रश्न मार्गी लागतील. मागली पिढी अशिक्षित होती, म्हणून चालले. अन्यथा, पुढची पिढी ही परिस्थिती मान्य करणार नाही, असे प्रतिपादन शिराळा पश्चिम मनसे जिल्हाध्यक्ष तानाजीराव सावंत यांनी केले.
शेडगेवाडी (ता. शिराळा) येथे सर्वपक्षीय पाणी परिषदेच्या बैठकीत ते बोलत होते. जिथे खरा दुष्काळ पडतो, तिथे मदत मिळत नाही. मात्र, ज्या भागाच्या दोन्ही बाजूला पाणीच पाणी ती गावे दुष्काळात दाखवली असल्याचे पुरावे या वेळी त्यांनी सादर केले.
बैठकीत डोंगरी भागासाठी मिळणारा दोन कोटी निधी दुर्गम भागातील ग्रामपंचायतींना मिळणे गरजेचे आहे. स्वतंत्र डोंगरी विकास महामंडळ, उंचावरील गावात उपसा जलसिंचन योजना, मुलांसाठी वसतिगृह, आर्थिक उन्नती योजना, चांदोली पर्यटन, पश्चिम भागात छोटी क्रीडा संकुले, विकेल ते पिकेल योजना, आत्मनिर्भर योजना, औषधी पीक योजना, कुशल कामगारांसाठी प्रशिक्षण द्या आदी मागण्या करण्यात आल्या.
या वेळी माजी प्राचार्य कादर नायकवडी, संजय घोडे, राजू पाटील, पोपट महाराज सावंत यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी संजय शिरसट, राजू पाटील, संजय घोडे-पाटील, संजय पाटील, सरपंच अमर पाटील, दीपक गुरव, सुशांत वाघमारे, महादेव आस्कट, विशाल नायकवडी, संदीप पाटील आदी उपस्थित होते.