कडेगाव तालुक्यात ‘कही खुशी, कही गम’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 07:18 AM2021-02-05T07:18:41+5:302021-02-05T07:18:41+5:30
आमदार मोहनराव कदम, प्रांताधिकारी गणेश मरकड, तहसीलदार डॉ. शैलजा पाटील यांच्या उपस्थितीत सकाळी ११ वाजता सोडत काढण्यात ...
आमदार मोहनराव कदम, प्रांताधिकारी गणेश मरकड, तहसीलदार डॉ. शैलजा पाटील यांच्या उपस्थितीत सकाळी ११ वाजता सोडत काढण्यात आली.
तालुक्यातील काही गावांमध्ये सरपंचपदासाठी बाशिंग बांधून बसलेल्या अनेकांचा हिरमोड झाला आहे. अनेकांना अनपेक्षितपणे सोडत लागल्याने उत्साह दिसून येत होता. सोडतीनुसार जाहीर झालेले आरक्षण पुढीलप्रमाणे :
सर्वसाधारण खुले सरपंचपद सोनसळ, आसद, हिंगणगाव -बु, उपाळे वांगी, आंबेगाव, कान्हरवाडी, खेराडेवांगी, भिकवडीखुर्द, बेलवडे, तुपेवाडी (ये), कडेपूर, नेर्ली, शिवणी, अपशिंगे, करांडेवाडी, शिवाजीनगर या १६ गावांमध्ये राहणार आहे. सर्वसाधारण महिलांसाठी शिरसगाव, सोनकिरे, वांगी, मोहित्याचे वडगाव, शिरगाव, बोंबाळेवाडी, रायगाव, ढाणेवाडी, येतगाव, वाजेगाव, सासपडे, विहापूर, रेणुशेवाडी, नेवरी, निमसोड, खंबाळेऔंध, कोतवडे.
अनुसूचित जातीसाठी हणमंतवडिये, खेराडे विटा, शेळकबाव. अनुसूचित जाती महिलांसाठी वडियेरायबाग, अंबक आणि सोहोली. नागरिक मागास प्रवर्गासाठी चिंचणी, रामापूर, तोंडोली, पाडळी, उपाळेमायणी, शाळगाव, चिखली. नागरिक मागास प्रवर्गातील महिलांसाठी देवराष्ट्रे, तडसर, येवलेवाडी, अमरापूर, हिंगणगाव खु, कुंभारगाव, कोतीज, येडे या गावांचा समावेश आहे.
फोटो-२९कडेगाव१
फोटो : कडेगाव तालुक्यातील ५४ ग्रामपंचायतींची आरक्षण सोडत काढण्यात आली. यावेळी आमदार मोहनराव कदम, प्रांताधिकारी गणेश मरकड, तहसीलदर डॉ. शैलजा पाटील आदी उपस्थित होते.