Sangli: चांदोली धरणातील पाणीसाठ्यात काही प्रमाणात वाढ, पाथरपुंज येथे ८६ मिलिमीटर पावसाची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2024 12:31 PM2024-06-27T12:31:20+5:302024-06-27T12:31:48+5:30

विकास शहा शिराळा : चांदोली (ता. शिराळा) धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने तीन दिवसांच्या उघडीपीनंतर हजेरी लावली आहे. या धरणात ...

Some increase in water storage in Chandoli dam in Sangli, 86 mm rain recorded at Patharpunj | Sangli: चांदोली धरणातील पाणीसाठ्यात काही प्रमाणात वाढ, पाथरपुंज येथे ८६ मिलिमीटर पावसाची नोंद

Sangli: चांदोली धरणातील पाणीसाठ्यात काही प्रमाणात वाढ, पाथरपुंज येथे ८६ मिलिमीटर पावसाची नोंद

विकास शहा

शिराळा : चांदोली (ता. शिराळा) धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने तीन दिवसांच्या उघडीपीनंतर हजेरी लावली आहे. या धरणात १०.८८ टीएमसी एकूण, तर ४ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. धरणातून ६७५ क्युसेकने पाणी नदीपात्रात सोडले आहे. पाणलोट क्षेत्रात पावसाची चांगली हजेरी लागल्याने ६७५ क्युसेकने पाण्याची आवक सुरू झाली आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. पाथरपुंज, निवळे येथे अतिवृष्टी झाली आहे. बुधवारी चोवीस तासात पाथरपुंज येथे ८६, निवळे येथे ८७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

गतवर्षी कमी पाऊस पडल्याने नोव्हेंबर महिन्यापासून या धरणातून मागणीनुसार नदीपात्रात व कालव्यामध्ये पाणी सोडण्यात येत होते. गेल्या काही दिवसांपासून पावसाने हजेरी लावली होती. मात्र, गेल्या तीन दिवसात पूर्ण उघडीप दिली होती. मंगळवारी तालुक्यात लहान मोठ्या सरी पडल्या. यामुळे शेतकरीवर्गात समाधानाचे वातावरण आहे. चांदोली धरण परिसरात १ जूनपासून ३५६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पाथरपुंज, निवळे या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झाली होती. तीन दिवसांनी पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने धरणामध्ये पाण्याची काही प्रमाणात आवक सुरू झाली आहे. त्यामुळे पाणीसाठ्यात वाढ होत आहे.

चांदोली धरणातून ६७५ क्युसेकने नदीपात्रामध्ये विसर्ग सुरू आहे, तर पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसाने ६७४ क्युसेकने पाण्याची आवक सुरू झाली आहे. शिराळा शहरासह तालुक्यात तीन दिवस पावसाने पूर्ण उघडीप दिली होती. तीन दिवसानंतर पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने पिकांना जीवदान मिळाले आहे.

चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात शनिवार सकाळी ७:००पर्यंत पडलेला पाऊस कंसात एकूण पाऊस

चांदोली धरण - २९ (३५६)
पाथरपुंज - ८६ (८७७)
निवळे - ८७ (६२८)
धनगरवाडा - २५ (३६१)

पाथरपुंज येथे ११ जूनला ६९ मिलिमीटर, दि. २१ रोजी १३३ मिलिमीटर, दि. २३ जून १७६, तर आज बुधवार, दि. २६ रोजी ८६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

मंडलनिहाय पाऊस
कोकरूड - १२ (१३०)
शिराळा - ७.८ (१३८.२०)
शिरशी - ९ (२४९.४०)
मांगले - ५.८ (१८२.८०)
सागाव- ८.८ (१२८.२०)
चरण - २३.५ (३०९.५०)

Web Title: Some increase in water storage in Chandoli dam in Sangli, 86 mm rain recorded at Patharpunj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.