सावल्या गायब : सांगलीत काहीठिकाणी ढगांचा अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 10:31 PM2018-05-07T22:31:56+5:302018-05-07T22:58:35+5:30

सांगली : सावली गायब होण्याच्या खगोलीय चमत्काराचा अनुभव सांगलीकरांनी सोमवारी घेतला.

 Somewhere missing: Cloud obstruction in some places in Sangli | सावल्या गायब : सांगलीत काहीठिकाणी ढगांचा अडथळा

सावल्या गायब : सांगलीत काहीठिकाणी ढगांचा अडथळा

googlenewsNext

सांगली : सावली गायब होण्याच्या खगोलीय चमत्काराचा अनुभव सांगलीकरांनी सोमवारी घेतला. दुपारी साडेबारा वाजल्यापासून काही मिनिटे सूर्य डोक्यावर आल्यानंतर सावल्या अदृश्य झाल्या. काहीठिकाणी ढगांच्या दाटीने ‘शून्य सावली दिवस’ अनुभवता आला नाही.

सांगलीत दुपारी १२ वाजून २८ मिनिटांनी सावल्यांच्या लपाछपीचा खेळ सुरू झाला. काही मिनिटातच पुन्हा सावल्या पूर्ववत दिसू लागल्या. खगोलीय चमत्काराच्या या घटनांचा आनंद विज्ञानप्रेमींसह नागरिकांनी लुटला. काहीठिकाणी ढगांची दाटी असल्यामुळे सावलीचा हा खेळ पाहण्याचा आनंद नागरिकांना मिळू शकला नाही. सांगलीत दरवर्षी विज्ञानप्रेमी संघटनांकडून शून्य सावलीनिमित्त वेगवेगळे प्रयोग केले जातात. यंदाही काचेच्या टिपॉयवर वेगवेगळ््या वस्तू ठेवून त्यांची सावली गायब होतानाचे प्रयोग नागरिकांना दाखविण्यात आले.

कर्क वृत्त आणि मकर वृत्त या दोन वृत्तांमध्ये राहणाऱ्या लोकांना वर्षातून दोनवेळेला हा शू्न्य सावलीचा अनुभव घेता येतो. आपली पृथ्वी ज्या अक्षाभोवती फिरते त्याला २३.५ डिग्रीएवढा कल आहे. पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याच्या मार्गाला आयनिक वृत्त असे म्हणतात. पृथ्वी ही कर्कवृत्तावरून बरोबर ३ महिन्यांनी वसंत संचात बिंदूपाशी येते. यादिवशी १२ तासांची रात्र आणि १२ तासांचा दिवस असतो. यादिवशी सूर्याची किरणे विषुववृत्तावर वरुन पडतात. त्यामुळे विषुववृत्तावर कुठेही आपण उभारलो तरी काही काळासाठी आपली सावली गायब होत असते. यानंतर बरोबर तीन महिन्यानंतर मकर वृत्तावर, त्याच्या ३ महिन्यांनी परत विषुववृत्तावर आणि नंतर पुन्हा तीन महिन्यानंतर कर्क वृत्तावर शून्य सावलीचा आनंद घेता येतो.

Web Title:  Somewhere missing: Cloud obstruction in some places in Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.